चिंदर शाळेच्या मुलांनी घेतले शेतीकामांचे धडे

चिंदर शाळेच्या मुलांनी घेतले शेतीकामांचे धडे

Published on

चिंदर शाळेच्या मुलांनी घेतले शेतीकामांचे धडे
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : राज्याच्या ‘आनंददायी शनिवार’ या संकल्पनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर-सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा हा उपक्रम आज राणेवाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड तसेच पालक उपस्थित होते. प्रशालेतील बहुतांश मुले शेतकरी कुटुंबातीलच असल्याने शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व आनंददायी असाच ठरला. सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहिती मिळावी, या हेतूने राज्याच्या ''आनंददायी शनिवार'' या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला. शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेण्यात आली. भात लावणी तसेच शेतीबाबत प्रत्यक्ष अनुभव सर्व मुलांनी एकत्रितरित्या अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती, शेतकरी या सर्वांच्या एकत्रित सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.