‘म्हादई प्रवाह’कडून विर्डीची पाहणी

‘म्हादई प्रवाह’कडून विर्डीची पाहणी

Published on

‘म्हादई प्रवाह’कडून
विर्डी येथे पाहणी

जल तंटा : महाराष्ट्राकडून काटेकोर पालन

सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. ६ : महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांमध्ये पाणी वाटप म्हादईवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलतंटा लवादाने नेमलेल्या म्हादई प्रवाह प्राधिकरण समितीने आज विर्डी धरणाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी लवादाने नेमून दिलेल्या अटी-शर्थीच्या अधिन राहून धरणात पाणीसाठा झाला आहे की नाही, याची पडताळणी केली. महाराष्ट्र सरकारकडून काटेकोर पालन होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
कर्नाटक सरकारचा कळसा-भांडुरा प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकारचा विर्डी धरण प्रकल्प यावरून गोवा-कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांत वाद आहेत. विर्डी धरणाच्या उंचीला गोव्याने आक्षेप घेतला असून, धरणाची उंची वाढविल्यास त्याचा विपरीत परिणाम गोव्यातील साखळी व आजूबाजूच्या परिसराला बसेल आणि उन्हाळ्यात वाळवंटी नदीचे पात्र आटून तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल, असे गोव्याचे म्हणणे आहे. सध्या त्यावरच केंद्रीय जलतंटा लवादाकडे दोन्ही राज्यांकडून वाद-विवाद सुरू आहेत. त्यानुसार या लवादाने विर्डी धरण बांधकामास काही अटी व शर्थी घालून दिल्या आहेत. त्या अटीनुसार विर्डी धरणात फक्त १५.९३ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा होऊ शकतो. त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी लवादाने नेमलेल्या म्हादइ प्रवाह प्राधिकरण समितीने शनिवारी विर्डी धरणाला भेट देत पाहणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष पी. एम. स्कॉट व इतर सदस्यांसह, लघु पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, उपविभागीय अभियंता मंगेश माणगावकर आदी उपस्थित होते. या वेळी त्यांनी तालुक्यातील आंबडगाव, तळेखोल धनगरवाडी, मोराची राई व विर्डी या प्रस्तावित प्रकल्पाची पाहणी केली.
दरम्यान, शुक्रवारी समितीने म्हादइ खोरे व कळसा-भांडुरा प्रकल्प आदींना भेट दिली. यावेळी कर्नाटक व गोव्याचे जलस्रोत खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

तिलारी प्रकल्पाची पाहणी
महाराष्ट्र व गोवा संयुक्त विद्यमाने उभारलेल्या तिराळी प्रकल्पाची म्हादई प्रवाह प्राधिकरण समितीचे अध्यक्ष पी. एम. स्कॉट यांनी पाहणी केली. त्यांनी प्रथमच तिलारी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी टिराळीचे उपविभागीय अधिकारी बुचडे व उपविभागीय अभियंता मेहेत्रे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.