दशावतार कलेच्या गौरवासाठी कटिबद्ध

दशावतार कलेच्या गौरवासाठी कटिबद्ध

दशावतार कलेच्या गौरवासाठी कटिबद्ध

वैभव नाईक ः कुडाळात दशावतार नाट्यमहोत्सवास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः कोकणच्या दशावतार लोककलेला व्यासपीठ मिळवून देण्याचे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळचे काम कौतुकास्पद आहे. हा ग्रुप गेली बारा वर्षे अर्थात एक तप हा मॉन्सून महोत्सव साजरा करत आहे. येथील कलावंतांना शासन दरबारी मानधनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. भविष्यातही दशावतार कलावंताच्या कलेचा गौरव होण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मॉन्सून महोत्सवअंतर्गत आयोजित संयुक्त दशावतार नाट्यमहोत्सवात शनिवारी (ता. ६) रात्री केले.
येथील लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळ आयोजित मॉन्सून महोत्सवाचे उद्‍घाटन येथील सिध्दिविनायक हॉल (रेल्वेस्टेशन रोड) येथे शनिवारी करण्यात आले. उद्‍घाटनानंतर ‘महारथी कर्ण’ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर झाला. महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. कुडाळ येथे हा दोन दिवसीय महोत्सव आयोजित केला आहे. लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी राजेश म्हाडेश्वर, सचिव स्वरूप सावंत, सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट, संजय करलकर (मुंबई), दीपक भोगटे, सुहास चव्हाण (मुंबई), संजय गावस (गोवा), पोलिस कर्मचारी संजय मांजरेकर (ओरोस), बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा प्रकाश पारकर, दशावतार कलाकार सिद्धेश कलिंगण, दिनेश गोरे, अमोल राणे (कणकवली), प्रिन्स स्पोर्ट्सचे सुनील धुरी आदी उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर या महोत्सवाला आमदार नाईक, राज्याच्या सेन्सॉर बोर्डचे सदस्य तथा कुडाळचे माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट दिली
अध्यक्ष राजू पाटणकर व सहकाऱ्यांनी स्वागत केले. राजा सामंत यांनी निवेदन केले. संयुक्त दशावतारी ‘महारथी कर्ण’ या नाट्यप्रयोगात जिल्ह्यातील आघाडीच्या कलाकारांनी सहभाग घेतला. रविवारी (ता. ७) ‘इंद्रभक्त इंद्रभानू’ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. यात प्रतीक कलिंगण (गणपती), संजय वालावलकर (इंद्र), भरत नाईक (इंद्रभानू), सिध्देश कलिंगण (कृष्ण), उदय मोर्ये (मेघवर्ण), सागर गावकर (वृषकेतू), प्रसाद तवटे (भीम), यश जळवी (रंभा), शिवा मेस्त्री (द्रौपदी), चारुहास मांजरेकर (नारद), केशव खांबल (मारुती) या कलाकारांचा सहभाग होता. त्यांना अमोल मोचेमाडकर (हार्मोनिअम), अर्जुन सावंत (पखवाज) व हरेश नेमळेकर (तालरक्षक) यांनी संगीत साथ दिली.
.............
चौकट
‘दशावतार’चा माहिती ग्रंथ साकारणार
लाजरी ग्रुपच्या संयुक्त दशावतार महोत्सवाने एक तप पूर्ण केले आहे. मी तमाम जिल्हावासीयांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी सेन्सॉर बोर्डावर सदस्य झालो आहे. हे सदस्यपद म्हणजे साता समुद्रापार पोहोचलेल्या दशावतार लोककलेसाठी माझी बांधिलकी आहे. म्हणूनच भारत सरकारच्या संगीत सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत जिल्ह्यातील लोककलेबाबतची सर्वांगीण परिपूर्ण माहिती घेताना तुम्हा सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. ही कला अधिक वृद्धिंगत होण्यासाठी सर्वांनी एका छत्राखाली येणे आवश्यक आहे. ज्यांनी या कलेसाठी योगदान दिले आणि आता देत आहेत, अशा सर्वांची माहिती असणारा परिपूर्ण माहिती ग्रंथ भारत सरकारच्या संगीत सांस्कृतिक विभागामार्फत करण्याचा मानस आहे. याबाबत प्राथमिक बोलणी झाली असून, लवकरच मान्यताही मिळेल, असे सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा रंगकर्मी विजय चव्हाण यांनी सांगितले. दशावतारासाठी विविध योजना राबविण्यासाठी मी निश्चितच या पदाचा वापर करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
95336

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com