सोनुर्लीतील बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करु

सोनुर्लीतील बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करु

Published on

95342

सोनुर्लीतील बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करु
जिल्हा प्रबंधक जिन्नू यांची ग्वाही; ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाने विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः सोनुर्ली गावासाठी उभारण्यात आलेला बीएसएनएलचा टॉवर वारंवार बंद असल्याने ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाने बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक जिन्नू यांना कार्यालयात जात जाब विचारला. टॉवर बंद करा; अन्यथा सुरळीत चालु करा, अशी मागणी केली. यावेळी तात्काळ टॉवरला भेट देऊन तो कार्यान्वित करण्याचे आश्वासन श्री. जिन्नू यांनी दिले.
सोनुर्ली गावात बीएसएनएलचा टॉवर असून नसल्यासारखा आहे. या ठिकाणी बॅटरी बॅकअप नसल्याने हा टॉवर जास्त करून बंदच असतो. टॉवरकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करुनही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक शब्बीर मणीयार, शहर प्रमुख शैलेश गंवडळकर, सोनुर्ली उपविभाग प्रमुख विनोद ठाकुर, शाखा प्रमुख नरेश मोर्ये, संकेत गावकर आदींनी बीएसएनल कार्यालयात जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी श्री. ठाकूर यांनी श्री. जिन्नु यांचे लक्ष वेधतांना सोनुर्ली गावासाठी पाच वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र, या टॉवरची सेवा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या टॉवरसाठी आवश्यक असलेली बॅटरी बॅकअप केव्हाची चोरीला गेली असून टॉवरसाठी आलेली इलेक्ट्रिक केबल अंडरग्राउंड नसल्याने ती वारंवार कट होऊन या टॉवर बंद पडतो, असे सांगितले. याबाबत तात्काळ लक्ष देऊन टॉवर सुरळीत करण्यासाठी पाऊले उचलली जातील, असे आश्वासन जिन्नू यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.