दाभोळे शेतकऱ्यांचे नुकसान

दाभोळे शेतकऱ्यांचे नुकसान

Published on

95325

दाभोळेतील शेतकऱ्यांचे नुकसान
संगमेश्वर, ता. ७ ः दाभोळे कुरचुंब मार्गे लांजा या मार्गावर रस्त्याला गटार नसल्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये पावसाचे पाणी वाहत जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची पिके उगवण्याआधीच नष्ट होत आहेत, अशी तक्रार दाभोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनू सुकम यांनी केली आहे. ते म्हणाले, येथील शेतकरी कोणतीही तक्रार करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. प्रतिवर्षी शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. पावसाचा जोर वाढण्याआधी या मार्गावर गटारांची व्यवस्था न केल्यास शेतकरीआंदोलन करतील. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनात या मार्गावरील तुंबणाऱ्या मोरया आणि जोरदारपणे शेतात वाहणारे पाणी याचा बांधकाम विभागाने विचार करू नये काय असा प्रश्न सुकम यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.