संवादातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो

संवादातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो

95361

संवादातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो
राजेंद्र वारे ; सावर्डे विद्यालयात पालक संवाद, विद्यार्थी गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 7 ः ज्ञानाजर्नाबरोबर कौटुंबिक जाणीव असणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी होतो. संस्थेने दिलेल्या सर्व शैक्षणिक सोयींचा योग्य वापर करून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे आवश्यक आहे. अशा संवादातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या पालकसभेला 749 पालक उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक व स्वागत अमित साळवी यांनी केले. पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघटित प्रयत्नाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे, याची माहिती प्रस्ताविकातून अशोक शितोळे यांनी दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक उध्दव तोडकर यांनी पालकांची भूमिका व विविध उपक्रम याविषयी विवेचन केले. शालेय परीक्षा व त्यांचे नियोजन, जादा सराव परीक्षेबाबत उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी माहिती दिली. मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी मार्गदर्शनात विद्यालयाने प्राप्त केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमातील यशाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला आणि विद्यार्थी सुसंस्कृत घडण्यासाठी परिसरातील अनेक घटक कसे उपयुक्त असतात याची उदाहरणासह माहिती दिली. विद्यालयातील विविध उपक्रम व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी एनएमएमएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, दहावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी, विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. या पालक सभेत पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. सुधीर कदम यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com