पावसमध्ये १२१, फणसोपमध्ये १४२ मिमी पाऊस

पावसमध्ये १२१, फणसोपमध्ये १४२ मिमी पाऊस

९५३९३

नाखरे कालकरकोंडमध्ये
घरावर झाड कोसळून नुकसान
पावस, ता. ७ः पावस पंचक्रोशीत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारपासून दमदार सुरवात केली आहे. हा पावसाचा जोर रविवारी दिवसभर कायम होता. दिवसभरातमध्ये पावसमध्ये १२१ मिमी, तर फणसोप परिसरामध्ये १४२ मिमी पावसाची नोंद झाली. वादळी पावसाच्या दणक्याने नाखरे कालकरकोंड येथील संतोष दादू कालकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले.
पावसमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. अमावस्येनंतर पावसाचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता होती, परंतु गेले दोन दिवस तरण्याने चांगली सुरवात केल्यामुळे हे नक्षत्र चांगल्या प्रकारे पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे भाताची रोपे रुजून आलेल्या अनेक प्रक्षेत्रामध्ये भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी लावणीच्या कामात दंग झाले आहेत. वादळी पावसामध्ये तालुक्यातील नाखरे कालकरकोंड येथील संतोष दादू कालकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले असले तरी अद्याप वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. रत्नागिरी तालुक्यामध्ये सरासरी ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

चौकट
रत्नागिरी तालुक्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये (सरासरी)
पावस- १२१.०० मिमी
जयगड- ११६.०० मिमी
मालगुंड - ११९.०० मिमी
खेडशी - ११०.०० मिमी
रत्नागिरी - १३२.०० मिमी
तरवळ- १३१.०० मिमी
फणसोप- १४२.०० मिमी
पाली- १०२.०० मिमी
कोतवडे- ६०.०० मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com