वेंगुर्लेमध्ये पावसामुळे
भातशेती पाण्याखाली

वेंगुर्लेमध्ये पावसामुळे भातशेती पाण्याखाली

Published on

वेंगुर्लेमध्ये पावसामुळे
भातशेती पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः तालुक्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मार्ग ठप्प झाले. संततधार पावसामुळे नदी, ओहोळ दुथडी भरून वाहत असल्यामुळे परिसर जलमय झाला होता.
या पावसामुळे वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावर तळवडे-होडावडा जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ठप्प होती. गेल्या आठ दिवसांपासून काही प्रमाणात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणचे नदी, ओहोळ दुथडी भरून प्रवाहित झाले. भातशेती पाण्याखाली येऊन परिसर जलमय झाला. तळवडे बाजारपेठ, होडावडा-तळवडे नदीवरील पूल तसेच सुभाषवाडी मार्गे मातोंड रस्त्यावरील होडावडे व मातोंड गावांना जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्याने या सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प होती. सायंकाळी साडेपाचनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली.
95400

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.