साखळोली येथे प्रोमतर्फे वृक्ष लागवड

साखळोली येथे प्रोमतर्फे वृक्ष लागवड

९५३८४

साखळोली येथे
प्रोमतर्फे वृक्ष लागवड
निसर्गपूरक प्रकल्पातून रोजगार ; गावतळेच्या विकासासाठी प्रयत्न
गावतळे, ता. ७ः जागतिक वृक्ष दिनी इंद्रधनु व्हिलेज या दापोली तालुक्यातील साखळोली येथील प्रोजेक्टमध्ये प्रोम कंपनीकडून वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी रोजगार निर्मिती व निसर्ग पूरक कोकण याचा समतोल राखत असल्याचे प्रोमचे तुषार जोशी यांनी सांगितले.
गावतळे परिसराला नवीन ओळख देणाऱ्या प्रोम ग्रुप ऑफ कंपनीतर्फे वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जोशी म्हणाले, गावात उत्तम रस्ते, नियमित वीजपुरवठा आणि मुबलक पाणी या तर विकासाच्या गोष्टी आहेत. पण त्याहूनही महत्त्वाचे आहे, ते म्हणजे सक्षम रोजगार आणि रोजगारासोबत सुदृढ जीवनशैली. या सगळ्याचे समीकरण योग्यरीतीने जुळून आले तर खर्‍या अर्थाने गावचा विकास झाला असे म्हणता येईल. हाच विचार लक्षात घेऊन तो प्रत्यक्षात निर्माण करण्याचे कार्य कंपनी करत आहे. २०१३ साली ''जांभा सिटी, हा पहिला प्रकल्प दापोलीतील शिवनारी गावात साकारला. २०१६ साली शिरशिंगे गावात ''जनक जांभा नगरी, हा कोकणातील पहिला आयजीबीसी प्रमाणित प्रकल्प साकारला. तो अगदी पर्यावरणाला कुठलाही हानी न पोहोचवता केलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पात जवळ जवळ ८०० पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण केले. २०१९ ला ''कुटुंब या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. २०२० ला शहराकडे असलेला किचन आणि फर्निचरचा प्रकल्प गावतळे येथे उभारला. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला. आता इंद्रधनू व्हिलेज आणि नक्षत्र या दोन प्रकल्पांमुळे अधिक रोजगार निर्माण होणार आहे. प्रोमोच्या हॉलिडेज या कंपनीच्या माध्यमातून अनेक महिलांना पायावर उभे राहण्यास मदत झाली. गावाच्या विविध विकासात्मक कामांमध्ये योगदान राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com