सावंतवाडी तालुक्याला झोपडले

सावंतवाडी तालुक्याला झोपडले

95435
सावंतवाडी : शहरातील नव्याने सुरू असलेल्या संत गाडेबाबा भाजी मंडईचे फाउंडेशन पाण्याखाली गेले.

95442
सावंतवाडी : शहरातील जयप्रकाश चौक परिसर पाण्याखाली गेला होता.

95430
सावंतवाडी ः मुख्य बाजारपेठेत साचलेले पाणी.

95432
सावंतवाडी : येथील पेडणेकर बुक स्टॉलमध्ये पाणी साचून नुकसान झाले.

95440
सावंतवाडी : येथील बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये पूर्णतः पाणी शिरले होते.

95445
मळगाव ः झाराप-पत्रादेवी महामार्गानजिक रेडकरवाडी परिसरातील शेती पाण्याखाली गेली होती.


सावंतवाडी तालुक्याला पावसाने झोपडले

शहरातील बाजारपेठ पाण्याखाली; २० ते २५ दुकानांमध्ये घुसले पाणी शिरल्याने नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार उडवला. मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवनही विस्कळीत झाले तर सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी तुंबल्याने बाजारपेठेतील तब्बल २० ते २५ दुकानांत पाणी घुसून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पालिका प्रशासनाने गटारांची सफाई न केल्याने हा प्रकार उद्‍भवल्याची नाराजी व्यापारी तसेच नागरिकांनी केली.
तालुक्यामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत अचानक पाणी तुंबले. शहरातील हॉटेल मॅंगोपासून गांधी चौक परिसरात पूर्णतः गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील रस्त्याच्या बाजूच्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरून आतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हॉटेल चंदू भवन समोरील व बाजूच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. होलसेल दुकानदार आर. एस. मुंज, श्री. वागळे, श्री. पोकळे तसेच बाळकृष्ण कोल्ड्रिंक, जय अंबे बेकरी, गवत मार्केट शेजारील पेडणेकर बुक स्टॉल तसेच सिताराम पेडणेकर व गजानन करमळकर यांच्या मिठाच्या दुकानातही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पेडणेकर बुक स्टॉलमध्ये पाणी शिरल्याने पुस्तकांसह अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले. तर गजानन करमळकर यांच्या मिठाच्या दुकानात पाणी गेल्याने मिठाची पोती भिजून गेली. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी येऊन पाहणी करत पालिका कर्मचाऱ्यांमार्फत तुंबलेली गटारे खुली करण्याचा प्रयत्न केला. जवळपास दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुंबलेले पाणी तीन वाजेपर्यंत ओसरले नव्हते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन पाणी निचरा करण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटार साफ करण्याकडे झालेले दुर्लक्ष तसेच शहरात चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले बांधकाम लक्षात घेता आजची ही परिस्थिती ओढवली, असा आरोप अनेक व्यापाऱ्यांकडून करण्यात आला.
नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या दोन घरांवर डोंगराचा मातीचा काही भाग कोसळला. सावंतवाडी पालिकेची पाईपलाईन फुटल्यामुळे हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, त्या ठिकाणी राहणारे रांगोळी कलाकार सलाम तहसीलदार आणि गणेशमूर्ती कलाकार तुषार कुडपकर यांचे मोठे नुकसान झाले.
शहरातील चिटणीस नाका परिसरात सकाळ कार्यालयाच्या पाठीमागून जाणाऱ्या नाल्यातील पाणी तेथील सहदेव मालवणकर यांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले. पालिकेच्या चुकीच्या बांधकामाचा फटका बसल्याचे श्री. मालवणकर यांनी सांगितले.
-------------
चौकट
आपत्कालीन यंत्रणेचा पत्ताच नाही
शहरातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, वैभव म्हापसेकर, संजू मुद्राळे, आदींनी पाणी घुसलेल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यास मदत केली. शहरातील ही परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे श्री. दळवी यांनी पोलिस यंत्रणेला संपर्क साधूनही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणाही यावेळी दिसून आली नाही. नगराध्यक्ष संजू परब यांनीही शहरातील परिस्थितीचा आढावा घेत नुकसानीची पाहणी केली.
-----------
चौकट
झाड कोसळून कर्मचारी जखमी
नरेंद्र डोंगरावरील निसर्ग भ्रमंतीसाठी डोंगराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या तिकीट केंद्रावर झाड कोसळून वनकर्मचारी गंभीर जखमी झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विद्याधर शंकर सावंत (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. ते माजी सैनिक असून, सामाजिक वनीकरणमध्ये कार्यरत आहेत. त्यांना तत्काळ येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांचे सहकारी अशोक गावडे व उत्तम कदम यांनी त्यांना बाहेर काढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com