वकिलीसाठी महिलांना घरातून प्रोत्साहन आवश्यक

वकिलीसाठी महिलांना घरातून प्रोत्साहन आवश्यक

Published on

-rat६p३९.jpg-
P२४M९५४५८
रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आलेल्या महिला वकिल. पुढे बसलेले डावीकडून अॅड. विलास पाटणे, माजी न्यायमूर्ती मृदूला भाटकर, न्यायमूर्ती रेवती डेरे-मोहिते, न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायाधीश सुनील गोसावी.
---------------
वकिलीसाठी महिलांना प्रोत्साहन द्यावे

न्यायमूर्ती रेवती डेरे ः रत्नागिरी बारतर्फे सोराबजी सनद शताब्दी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : देशातील पहिल्या महिला वकील कार्नेलिया सोराबजी यांच्या सनद शताब्दीचा सोहळा करणारी रत्नागिरी बार असोसिएशन पहिली संघटना आहे. १०० वर्षांपूर्वी जी सामाजिक स्थिती होती, त्यात थोडे बदल होत गेले आहेत. परंतु आजही महिलांना दुय्यम समजले जाते. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या भरपूर आहे. त्या मुट कोर्ट स्पर्धांमध्ये बक्षीसेही मिळवतात. परंतु त्या वकिलीत येत नाहीत. त्याकरिता घरातून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती डेरे-मोहिते यांनी केले.

रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे गोगटे महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात शनिवारी सनद शताब्दी सोहोळ्यात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, महाराष्ट्र प्रशासकीय ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती मृदूला भाटकर, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार अॅड. पाटणे, सचिव अॅड. रत्नदीप चाचले, उपाध्यक्ष अॅड. निनाद शिंदे, महिला उपाध्यक्ष अॅड. शाल्मली आंबुलकर यांनी केला.
न्यायमूर्ती मृदूला भाटकर म्हणाल्या, कार्नेलिया सोराबजी यांनी प्रचंड संघर्ष करून वकिलीची सनद मिळवली. महिलांठी मोठे योगदान दिले. त्यांनी विविध पुस्तकेही लिहिली आहेत. खेळाच्या मैदानात सराव करताना मुली दिसत नाहीत, ध्वजवंदन सोहळ्यालाही त्यांची संख्या कमी असते, स्त्रीत्वाचे सामाजिक भान वेगळे आहे. त्यामुळे महिला सुशिक्षित झाल्या तर स्त्रीत्वाने सुसंस्कृत झालो आहोत का याचा विचार केला पाहिजे.
न्यायमूर्ती जामदार म्हणाले, सुसंस्कृतपणा आणि ज्ञान यांचा संगम रत्नागिरीत होतो, त्यामुळेच सनद शताब्दी सोहळा येथे होत आहे. महिला या खूप बलवान असतातच. न्यायाधीश म्हणून त्या सक्षम निर्णय घेतात अशी दोन उदाहरणे आज व्यासपीठावर आहेत. न्यायमूर्ती श्री. गोसावी यांनी सांगितले, कायदेविषयक शिक्षणातली सावित्रीबाई म्हणजे कार्नेलिया सोराबजी. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं.
----------
कोट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉ. पां. वा. काणे हे रत्नागिरी जिल्ह्यातले. लोकमान्य टिळकांचे लॉचे विद्यार्थी व मुळचे कोकणातील न्यायमूर्ती म. गो. रानडे हे मुंबई उच्च न्यायालयातील पहिले मराठी न्यायाधीश. असा वारसा रत्नागिरीला लाभला आहे. त्यामुळे सोराबजी यांचा सनद शताब्दी सोहळा साजरा करणे हे आमचे कर्तव्य आहे.
- अॅड. विलास पाटणे.
-------
यांचा झाला सत्कार
उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ अॅड. विद्या पाथरे, अॅड. अश्विनी आगाशे, अॅड. रुची महाजनी, अॅड. विनया घाग, अॅड. इंदुमती मलुष्टे, अॅड. सरोज भाटकर यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.