पान एक-तेलींच्या हाकलपट्टीची मागणी करणार

पान एक-तेलींच्या हाकलपट्टीची मागणी करणार

टीपः swt755.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - दीपक केसरकर

तेलींच्या हकालपट्टीची मागणी करणार
दीपक केसरकर ः आमदार होण्यासाठी पातळी सोडून टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : राजन तेली यांचे राज्यातील अस्तित्व काय आहे? तेली सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादीत आहेत; मात्र आमदार होण्यासाठी ते पातळी सोडून टीका करत आहेत. मी महायुतीचा धर्म पाळणारा आहे. त्यामुळे तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी त्यांच्या नेत्यांकडे करणार आहे. यापुढे तेली हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यांच्या टीकेवर उत्तर आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते देतील, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
श्री. तेली यांनी नुकतीच केसरकर यांना संच मान्यतेच्या निकषावरून टीका होती. केसरकर यांना शालेय शिक्षण खाते समजले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था दुर्दैवी झाली आहे, असे म्हटले होते. त्याला केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘मी तीनदा आमदार होऊन दोनदा मंत्री झालो आहे. माझे शिक्षणमंत्री म्हणून काम काय आहे, याचा अभ्यास तेलींनी करावा. त्यानंतरच टीका करावी. विविध उपक्रम आम्ही राबविलेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे तीन रेकॉर्ड आम्ही केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांना टीआर पदवी दिली आहे‌. माझ्या कामाचं कौतुक महाराष्ट्र करत आहे.’’
ते म्हणाले, ‘‘तेली यांचे पराभूत खासदार विनायक राऊत यांच्याशी सूर जुळतांना दिसत आहेत; मात्र, महायुतीचा धर्म न पाळता तेली माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मी महायुतीचा धर्म पाळत असल्याने गप्प आहे. शिवाय त्यांच्यावर बोलण्याएवढे ते मोठे नाहीत. त्यांच्या मर्यादा ह्या केवळ जिल्ह्यापुरत्या आहेत. त्यामुळे मी भाजपच्या नेत्यांकडे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा, अशी मागणी करणार आहे.’’


राऊतांच्याही टीकेला उत्तर
सावंतवाडी शहरातील तालुका शाळा दुरुस्तीच्या यादीत नव्हती‌. आपत्कालीन स्थितीमुळे तीची पडझड झाली. खासदार झालेल्या विनायक राऊत यांना शाळांची निगा जिल्हा परिषद राखते याचीही कल्पना नसावी, ही बाब दुर्दैवी आहे. छप्पराचे कौल फुटून पाणी आत गेल्याने पडझडीचा प्रकार घडला. मात्र, याबाबत योग्य ती चौकशी केली जात आहे. नादुरुस्त शाळांमध्ये माझे कार्यकर्ते जाऊन किरकोळ दुरुस्तीची कामे करत आहे‌त. सरकारचे पैसे मिळण्याआधी आम्ही सुरूवातीला मदत पोहोचवत आहोत ही वस्तुस्थिती आहे, असे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com