साटेलीत पुराच्या पाण्यात 
मोटार घालणे अंगलट
साटेलीत पुराच्या पाण्यात 
मोटार घालणे अंगलट

साटेलीत पुराच्या पाण्यात मोटार घालणे अंगलट साटेलीत पुराच्या पाण्यात मोटार घालणे अंगलट

Published on

95533
95534

साटेलीत पुराच्या पाण्यात
मोटार घालणे अंगलट

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७: साटेली भेडशी पुलावरून मोटार घेऊन जाणे वाहन चालकाच्या अंगलट आले. कारण ती गाडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होती. दरम्यान, मोटारीतील प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी धाव घेत मोटार पकडून ठेवली. त्यानंतर गाडीतील तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. साटेली भेडशी येथील नदीला पुर आला असून पर्यायी पूल पाण्याखाली गेला आहे. तर नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आले आहे. या पुलावरून गाडी घालणे अंगलट आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक व लातूर मधील दोघेजण साटेली-भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने येत होते. दरम्यान, नवीन पुलाच्या एका बाजूकडील पाण्यातून मोटार घातली व पूल ओलांडून पुन्हा पाण्यातून जात असता मोरीजवळ ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली. यावेळी गाडीत बसलेल्या तिघांनीही आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी लगतच क्रीडा संकुलाजवळ थांबलेल्या पाच ते सहा ग्रामस्थांनी धाव घेतली. वाहून जाणाऱ्या मोटारीला पकडून व दोरीच्या साह्याने झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर गाडीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.