लायन्सच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळा

लायन्सच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळा

- rat८p१.jpg-
२४M९५५५०
रत्नागिरी ः लायन्स क्लबचे नवीन पदाधिकारी.

‘लायन्स’च्या पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : लायन्सच्या २०२४-२५ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा रविवारी (ता. ७) हॉटेल वीवा एक्झिक्युटिवच्या सभागृहात झाला.
शपथविधी कार्यक्रम पीएमजेएप सीएला केशव फाटक यांच्या हस्ते झाला. या वेळी अध्यक्ष गणेश धुरी व कार्यकारिणीतील सदस्यांना शपथ देण्यात आली. मावळत्या अध्यक्षा एमजीएफला शिल्पा पानवलकर यांनी नूतन अध्यक्ष धुरी यांच्याकडे क्लबची सूत्रे सुपूर्द केली. कार्यकारिणीत अध्यक्ष गणेश धुरी, सचिव विशाल ढोकळे, सहसचिव शरद नागवेकर, खजिनदार अमेय वीरकर, सहखजिनदार सुमित ओसवाल, प्रथम उपाध्यक्ष दीप्ती फडके, द्वितीय उपाध्यक्ष डॉ. शिवानी पानवलकर, तृतीय उपाध्यक्ष संजय पटवर्धन आदींनी शपथ घेतली. या सर्वांना आपल्या पदाची जबाबदारी व कर्तव्य समजावून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी गायडिंग लायन पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उदय लोध, माजी विभागीय चेअरमन श्रेया केळकर, रिजन चेअरमन गजानन नाईक, झोन चेअरमन डॉ. नीलेश पाटील, चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश उपळेकर, अपर्णा उपळेकर तसेच लायन परिवारातील सदस्य, कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार उपस्थित होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com