''माझी लाडकी बहीण''साठी आचऱ्यात चारशे प्रस्ताव

''माझी लाडकी बहीण''साठी आचऱ्यात चारशे प्रस्ताव
Published on: 

95591

‘माझी लाडकी बहीण’साठी
आचऱ्यात चारशे प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ८ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भाजपतर्फे आचरा येथे सलग दोन दिवस दोन ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरांत एकूण ४१६ प्रस्ताव पाठविण्यात आले. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी या शिबिरांना भेट देत कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक संघटना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
यावेळी मालवण तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, महेश मांजरेकर, जयप्रकाश परुळेकर, बाबू कदम, कैलास गुरव यांसह अन्य मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, लक्ष्मण आचरेकर, बबन बापर्डेकर, सुगंधी गुरव, मनाली फाटक आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, त्यांचे प्रस्ताव परिपूर्ण व्हावेत, या हेतूने आचरा भाजपतर्फे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस ग्रामपंचायत आणि आचरा तिठा येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दोन्ही दिवस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केले. यासाठी मोफत झेरॉक्स व्यवस्थाही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ladki Bahin Yojana ₹1500 September installment latest update
Ladki Bahin Yojana September installment latest update
Ladki Bahin Yojana latest news
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com