कोकण संस्थेमार्फत मुलांना स्कूल किट

कोकण संस्थेमार्फत मुलांना स्कूल किट

Published on

95629


कोकण संस्थेमार्फत
मुलांना स्कूल किट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ : कोकण कला, शिक्षण विकास संस्था व तन्ना ट्रस्ट यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा वेवूर (जि. पालघर) येथील ८१० विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वितरण करण्यात आले. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. खेड्यागावांतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते; मात्र शिक्षणासाठी लागणारे साहित्य मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी भासू नये, त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी कोकण संस्थेच्यावतीने या किटचे वाटप करण्यात आले, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले. यावेळी कोकण संस्थेच्या उषा तन्ना, प्रीती पांगे, साक्षी पोटे, सूरज कदम, पालघर जिल्हा प्रमुख अजित दळवी, नूतन कदम, बिना अहिरे, निधी गुप्ता, नुपूर पाटेकर, इम्यानुएल दास, रोशन राणे, आयुष आंग्रे, कोमल कांबळे, सुनीता मर्चंडे, अभिजित रेडेकर, विजया वाळके, संदेश गायकवाड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.