पशुसंवर्धन प्रशिक्षण

पशुसंवर्धन प्रशिक्षण

रत्नागिरी पंचायत समितीतर्फे
पशुसंवर्धन प्रशिक्षण

रत्नागिरी ः पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात १५ जुलैपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे. प्रशिक्षणामध्ये पशुपालकांना दुग्धव्यवसाय, शेळीपालन तसेच कुक्कुटपालन विषयक सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या पशुपालकाना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी फोटो, आधारकार्ड सत्यप्रत, रहिवासी दाखला, अपत्य दाखला, रेशनकार्ड सत्यप्रत, जातीचा दाखला सत्यप्रत या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तालुक्यातील इच्छुक पशुपालकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा.
---

जिल्हा नियोजन समितीची
१५ जुलैला बैठक

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १५ जुलैला सकाळी ११ वा. अल्पबचत सभागृहात घेण्यात येणार आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी कळविले आहे.
------

प्राण्यांवरील हल्ले
भरपाईसाठी प्रस्ताव

संगमेश्वर ः जंगली वन्यप्राणी मनुष्यवस्तीकडे वळू लागल्यामुळे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत. या घटनांमधील मृत जनावरांच्या मालकांना शासनाकडून आर्थिक मदतीचा हात दिला जातो. संगमेश्वर तालुक्यातून गतवर्षी ५२ प्रस्ताव वनविभागाकडे आले होते. पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्यानंतर मृत जनावरांचे पंचनामे करून वनविभाग या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठवण्यात येतात. चालू वर्षामध्ये १० प्रकरणे मंजुरीसाठी वनविभागाकडून पाठवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना नुकसानीनंतर पुन्हा उभे राहता यावे यासाठी ही नुकसानभरपाई शासनाकडून दिली जाते. यापूर्वी आर्थिक नुकसानभरपाई तालुका वनविभागाकडे धनादेशाद्वारे येत होती. नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँकखात्यामध्ये जमा होते, असे वनपाल मुल्ला यांनी सांगितले.
---

बाबरशेख क्रीडा मंडळ
रक्तदान शिबिर

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार करण्यात आला. जागतिक रक्तदातादिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी हातिस येथील बाबरशेख क्रीडा मंडळाने सलग ८ वर्षे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप, डॉ. कुमरे, डॉ. सुतार यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. बाबरशेख क्रीडा मंडळातर्फे संकेत नागवेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा सन्मान सर्व रक्तदात्यांचा, शिबिर यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्व बंधू भगिनींचा आहे, असे त्यांनी सांगितले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com