आचरा, चिंदरमध्ये धोका टळला

आचरा, चिंदरमध्ये धोका टळला

95656
95657

आचरा, चिंदरमध्ये धोका टळला
पावसाची उसंत ः पूरस्थितीचा प्रशासनाकडून आढावा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ८ ः तालुक्यात रविवारपासून (ता. ७) मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आचरा पारवाडी, कालावल नद्या धोक्याच्या कक्षेत आल्या असून, नदीलगतच्या घरांना धोका निर्माण झाला होता; मात्र आज सकाळनंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे संभाव्य धोका टळला. याबाबत मंडल अधिकारी अजय परब, तलाठी संतोष जाधव, पोलिस नाईक मनोज पुजारे यांनी पूर सदृश स्थिती भागात पाहणी करून संबंधितांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
आचरा-पारवाडी नदीच्या देवगड किनाऱ्याबाजूने मुळये यांच्या घराला नदीच्या पाण्याचा वेढा पडला होता. पारवाडी येथील केदार शिर्के, साळसकर आदींच्या घरालगत नदीचे पाणी आले होते. चिंदर लब्देवाडी भागातही काही ठिकाणी अंगणात पाणी आल्याच्या घटना घडल्या. देवगड रस्त्यावर कावले हॉटेललगतच्या नाल्याला पूर आल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे वाहतुकीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता; मात्र आज सकाळी ९ नंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरायला लागले. त्यामुळे संभाव्य धोका टळला. दरम्यान, आचरा-पारवाडी, कालावल नद्या दुथडी भरून वाहु लागल्याने खाडी किनाऱ्यालगतची भातशेती धोक्यात आली आहे. पाणी शेतीत असेच साचून राहिल्यास शेती कुजण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com