बांद्यात युवकांकडून
मगरीला जीवदान

बांद्यात युवकांकडून मगरीला जीवदान

Published on

९५७०८

बांद्यात युवकांकडून
मगरीला जीवदान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रानजीक रस्त्यावर आढळलेल्या साडेसहा फूट लांबीच्या मगरीला स्थानिक युवकांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तेरेखोल नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहत येऊन ही मगर या ठिकाणी आल्याचे स्थानिकांनी सांगितले. ठाकरे शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांच्या दृष्टीस ही मगर पडली. त्यानंतर त्यांनी याची कल्पना इतरांना दिली. रियाज खान, साई सावंत, मुरारी सावंत, ओंकार बांदेकर यांनी या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तेरेखोल नदीत मगरींची संख्या लक्षणीय असून पावसाच्या पाण्याने या मगरी नजीकच्या वस्तीत येत आहेत. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.