महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेचा जागर

महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेचा जागर

Published on

-rat८p५७.jpg-
२४M९५६९९
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात महाकवी कालिदास दिनप्रसंगी कार्यक्रमात सहभागी.
----------
महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेचा जागर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाकवी कालिदासाच्या साहित्यकृतींचा व त्यातील भाषासौंदर्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिभेचा जागर करण्यात आला.
रत्नागिरी उपकेंद्रात कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि देवी सरस्वती, महाकवी कालिदास यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यानंतर नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी तेजस्विनी जोशी हिने महाकवी कालिदास यांच्या जीवनासंदर्भात संक्षिप्त व नेमकं मनोगत व्यक्त केलं. प्रा. कश्मिरा दळी यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्यसंपदेवर विस्तृत प्रकाश टाकला. महाकवी कालिदास यांच्या अमूल्य साहित्यसंपदेची उपस्थितांना ओळख करून दिली. प्रा. अविनाश चव्हाण यांनी त्याच साहित्याचे सूत्र धरून पुढे महाकवी कालिदास यांच्या साहित्यातील भाषासौंदर्य उलगडून दाखवलं. या वेळी नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशांक पाटील, संगीतशिक्षक विजय रानडे, अॅड. रजनी सरदेसाई, प्रा. अक्षय माळी, रत्नागिरी उपकेंद्रातील प्रथमेश घोसाळे, करण कीर, अपर्णा कोकरे, निकिता अरखराव आदी उपस्थित होते.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.