-सातपऱ्यावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळित

-सातपऱ्यावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळित

-rat८p६५.jpg-
२४M९५७३१
पावस ः गावडेआंबेरे सातपऱ्या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे कॉजवेवरून पाणी गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाले होते.
-------------

सातपऱ्याला पुराचे स्वरूप

पावसमध्ये पावसाचा जोर कायम ; शाळांना सुट्टी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ८ ः सतत पडणाऱ्या पावसामुळे पावस परिसरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केल्यामुळे एसटी स्टँड परिसरात वर्दळ कमी झाली होती. गावडेआंबेरे सातपऱ्या पुलावरून पुराचे पाणी गेल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाले होती. पावसामुळे परिसरामध्ये १२६ मिमी पावसाची नोंद झाली.
पावस परिसरामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना संभाव्य धोक्यापासून बचाव करण्यासाठी परिसरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आज पावस बसस्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो; मात्र शालेय विद्यार्थी नसल्यामुळे व पावसाचे प्रमाण कायम असल्यामुळे वर्दळ एकदम कमी झाली होती. दररोज पावसाचे प्रमाण अद्याप कायम असून, आज १२६ मिमी पावसाची नोंद झाली. फणसोप परिसरामध्ये १५७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या परिसरात जोरदार पाऊस कायम आहे. गावडेआंबेरे येथील सातपऱ्‍याला पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती. गेली दोन वर्षे रखडलेला पूल अद्याप पूर्ण न झाल्यामुळे भरावाचे काम अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे यावर्षीही या परिसरातील नागरिकांना सतत येणाऱ्या पुराचा सामना करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com