लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस

लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस

Published on

लांजा तालुक्यात
मुसळधार पाऊस

लांजा, ता. ८ ः तालुक्यात रविवारपाठोपाठ सोमवारही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर देवधे येथील साईडपट्टी खचली असून धनवडे शेती फॉर्म या ठिकाणी मोठे दगड खाली आले आहेत; मात्र यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा झालेला नाही.
तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आंजणारी, साटवली आणि नावेरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी लांजा तालुक्यात सरासरी १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने मोठे खड्डे आणि पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वाहनधारकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.