चिपळुणात धूर फवारणी

चिपळुणात धूर फवारणी

-rat८p७१.jpg-
२४M९५७५५
चिपळूण : शहरातील विविध भागात धूर व औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली.
-----------------

चिपळुणात धूर फवारणी मोहीम

साथरोग नियंत्रणासाठी पालिका प्रशासन सतर्क

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. ९ ः राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण उपक्रम नियोजनअंतर्गत चिपळूण पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात विविध भागात स्वच्छता, धूर व औषध फवारणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पालिकेत नुकतीच आरोग्य विभागांतर्गत मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली. यानुसार विविध कीटकांपासून पावसाळ्यात आजार व रोग पसरू नयेत याकरिता या कार्यशाळेत कीटकजन्य रोग नियंत्रण संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबरच उपाययोजनेबाबत नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्राथमिक नियोजनामध्ये शहरातील प्रत्येक विभागात गृहभेट देऊन फ्रिज, कूलर, फुलझाडांच्या कुंडी, टाकाऊ टायर, टाकीची झाकणे या संदर्भात संबंधित नागरिकांना टेलिफॉसचा वापर करून टाकाऊ साहित्यामध्ये पाणी साचणार नाही याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे स्वचछतेविषयक पत्रके वाटून आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती देण्यात आली. डासांच्या उत्पत्ती ठिकाणांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. प्राथमिक नियोजनानंतर शहरातील उक्ताड, पेठमाप, काविळतळी, रावतळे, धामणवणे, मार्कंडी, मुरादपूर, पागमळा, खंड कांगणेवाडी, बांधकाम भवन, राहुल गार्डन परिसर, गोवळकोट रोड, बाजारपेठ, मुरादपूर मिठागरी मोहल्ला परिसर, शिवाजीचौक, भोगाळे परिसर, छत्रपती संभाजी चौक मार्कंडी व परिसर, बहादूरशेख नाका, बांदल हायस्कूल परिसर, ओझरवाडी, बावशेवाडी, खंड जुने पोस्ट व तार कार्यालय परिसर, बुरूमतळी परिसर आदी भागातून आरोग्य विभागामार्फत स्वच्छतामोहिमेसह धूर व औषध फवारणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com