राणेंच्या उपस्थितीत होणार पहिली नियोजनची सभा

राणेंच्या उपस्थितीत होणार पहिली नियोजनची सभा

Published on

जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक

रत्नागिरी, ता. ८ : जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी (ता. १५) होणार आहे. सहा महिन्यानंतर ही बैठक होणार आहे. यामध्ये २०२४-२५ वर्षाचा ३०७ कोटींच्या आराखड्यातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा व विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर ही बैठक होत आहे. प्रथमच खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सहा महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. या वेळी ३०७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. राज्यशासनाने या आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे नियोजनची बैठक झाली नव्हती. लोकसभेनंतर विधान परिषदेसाठी कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे आणखी महिनाभर आचारसंहिता लांबली होती. आचारसंहिता संपल्यामुळे १५ जुलैला जिल्हा नियोजन समिती बैठकीचे आयोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.