१० वर्ष सक्तमजुरी,६० हजाराचा दंड

१० वर्ष सक्तमजुरी,६० हजाराचा दंड

टाळसुरेतील एकास
१० वर्षे सक्तमजुरी
महिलेच्या खुनाचा प्रयत्न : ६० हजारांचा दंड
खेड, ता. ८ : महिलेच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी मंगेश मधुकर चौगुले (रा. टाळसुरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याला येथील अतिरिक्त सत्र न्यायालय १ चे न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावास आणि ६० हजार रुपये दंड ठोठावला.
मौजे टाळसुरे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील पीडिताच्या नवऱ्याचा आरोपी हा नातेवाईक. मंगेश मधुकर चौगुले हा पीडितेला वारंवार त्रास देऊन तिची मानसिक छळवणूक करत होता. आरोपी पीडितेस सतत फोन करत असे आणि तिने फोन उचलला नाही या रागातून आरोपी याने २५ जानेवारी २०१७ ला पीडिता तिच्या घरातील पडवीमध्ये भांडी घासत असताना तिच्या गळ्यावर घरात घुसून ठार मारण्याच्या इराद्याने चाकूने वार करून पीडितेस जखमी केले आणि पसार झाला. संशयित आरोपी ७ महिन्यांनंतर पकडला जाऊन दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत होता. पीडितेने दिलेला जबाब विचारात घेऊन आणि तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची गंभीरता पुराव्यासह सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने आरोपीस दोषी धरले आणि शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला.
या प्रकरणी सरकारी वकील सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार अनिल लाड, सागर भगवान पवार, सुदर्शन गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com