सामंत

सामंत

Published on

उद्योग भवन इमारत निधीस प्रशासकीय मान्यता
पालकमंत्री उदय सामंत ः ३६ कोटी १५ लाख ७८ हजारांची केली तरतूद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत होणाऱ्या एकूण ६९०३.५४ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळावर रुपये २८ हजार प्रतिचौ.मी दराने एकूण ३६ कोटी १५ लाख ७८ हजार २६८ इतक्या रकमेच्या नवीन उद्योग भवन इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उद्योग भवन इमारतीसंदर्भात करावयाच्या बांधकामाचे विवरण परिशिष्ट अ प्रमाणे राहील. उद्योग भवन इमारतीसाठी सोलर यंत्रणेचा वापर करण्यात यावा. हे काम खासगी वास्तुशास्त्रज्ञाकडून करण्यात येत असल्याने त्या इमारतीचे हे सार्वजनिक बांधकाम विभाग/ शासकीय इमारतीच्या अनुज्ञेय मानकास अनुसरून असण्याची खातरजमा करावी. अशा नकाशांना व वास्तुमांडणी आराखड्यास शासनाचे वास्तुशास्त्रज्ञ यांची मान्यता घेण्याची कार्यवाही उद्योग संचालनालयाने करावी.
प्रस्तावित इमारतीचे जोते क्षेत्रफळ कर्मचारी वर्ग व शासकीय इमारती यांच्या अनुज्ञेय मानकाप्रमाणे असल्याची खातरजमा करण्याच्या अटीच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तावित प्रस्तावातील खरेदीशी संबंधित बाबींकरिता ई-निविदा प्रणालीचा अवलंब करून विभागाच्या शासन निर्णयातील निर्गमित सूचना विचारात घ्याव्यात. स्थापत्य कामाच्या कालावधीतच विद्युतीकरणाबाबत, तसेच इतर अनुषंगिक कामांचे योग्य नियोजन करून सदर कामे पूर्ण करण्यात यावीत. इमारतीमध्ये दिव्यांगाकरिता उपलब्ध करुन द्यावयाच्या विविध सोयींबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक २०२४०७०८१३००४४४२१० असा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.