पावसामुळे कणकवली तालुक्‍यात ७० लाखाची हानी

पावसामुळे कणकवली तालुक्‍यात ७० लाखाची हानी

Published on

kan92.jpg
95855
खारेपाटण : येथे आलेल्‍या पुराचे पाणी विहिरींमध्ये गेले होते. त्‍यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने विहिरीमध्ये निर्जंतुकीकरण कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

कणकवली तालुक्‍यात ७० लाखाचे नुकसान
कणकवली, ता. ९ : मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्‍यात सुमारे ७० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे महसुल विभागाने सांगितले. यात खारेपाटणमधील व्यापाऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. खारेपाटण बाजारपेठेतील ७० हून अधिक दुकाने आणि घरांमध्ये पाणी भरले होते. तर चार घरांवर झाडे पडल्‍याने नुकसान झाले आहे. बोर्डवे येथेही एका घरामध्ये पाणी भरले होते.
अतिवृष्‍टीमुळे खारेपाटणच्या सुखनदीला पूर आला. यात रहीम पाटणकर, चेतन घुले, यास्मिन रमदुल, प्रवीण सावंत, प्रणय घुरसाळे, साई चव्हाण, शंकर राऊत, सुधीर कुबल, प्राजल कुबल, गुरुनाथ कोवाळे, सुनीता शेटे, संतोष तळगावकर, बाळा शेट्ये, तावडे पान शॉप आदींसह ७० हून अधिक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. तर खारेपाटण परिसरातील चार घरांवर झाडे कोसळल्‍यानेही नुकसान झाले आहे.
तालुक्‍यातील बोर्डवे येथील नितीन राठवड यांच्या घरांमध्येही पाणी भरल्‍याने घरातील कपडे, धान्य व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. कसवण तळवडे येथील पुनाजी वायंगणकर यांच्या घराच्या पडवीतही पाणी आले होते. घोणसरी येथे पांडुरंग जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. शेर्पे येथील महेंद्र शेलार यांच्या घराची भिंत कोसळली. शिवडाव गावातील संजय राऊळ आणि भिरवंडे येथील हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.