-नांगरणीत कुरचुंबे, मार्लेश्वरच्या बैलजोडींची बाजी

-नांगरणीत कुरचुंबे, मार्लेश्वरच्या बैलजोडींची बाजी

- rat९p३.jpg -
२४M९५८३४
संगमेश्वर ः शिवसेना साखरपा विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेचे उद्घाटन करताना विलास चाळके, आमदार राजन साळवी, जया माने आणि अन्य

नांगरणीत कुरचुंबे, मार्लेश्वरची बैलजोडी प्रथम

भडकंबेत राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ; पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती, विजेत्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भडकंबा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेत ५०हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा पाहण्यासाठी पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेत कुरचुंब येथील द्वारकानाथ माने यांच्या बैलजोडीने घाटी गटात तर मार्लेश्वर येथील सांबा कांडकरी प्रसन्न ग्रुपच्या बैलजोडीने गावठी गटात प्रथम क्रमांक पटकावला.

नांगरणी स्पर्धेचे आयोजन शिवसेना दाभोळे जिल्हा परिषद गटाच्यावतीने करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी उत्तम असे मैदान तयार केले होते. स्पर्धेच्या सुरवातीला आमदार साळवी यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी कोकणमधील लाड बंधूंच्या सागर बैलाच्या पोस्टरला आदरांजली वाहण्यात आली. आमदार साळवी यांना विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी केक कापून वाढदिवसही साजरा केला गेला. या प्रसंगी आमदार साळवी यांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या हातून कायम सद्कार्य घडो, असा विश्वास व्यक्त केला. या स्पर्धेत एकापेक्षा एक अशा सरस बैलजोड्यांचा सहभाग होता. या वेळी आमदार साळवी यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी अनुराधा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, माजी जिल्हा परिषद सभापती रजनी चिंगळे, दत्ता घुमे, अजय सावंत, बापू शिंदे, शेखर आकटे, प्रवीण जोयशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते असे
या स्पर्धेमध्ये घाटी गटात द्वारकानाथ माने (प्रथम), विरोबा मानाई ग्रुप (द्वितीय), वैभव लाड (तृतीय), स्वराज गुरव (चतुर्थ), नवलाई देवधे (पाचवा क्रमांक) तर गावठी गटात सांब कांडकरी ग्रुप (प्रथम), जय संबा पाटगाव (द्वितीय), सुरेश सोलकर (तृतीय), हर्षद साळुंखे (चतुर्थ), आई जुगाई चोरवणे (पाचवा क्रमांक) यांनी यश मिळवले. त्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com