अस्मी साळुंखेचे यश

अस्मी साळुंखेचे यश

rat९p१०.jpg-
२४M९५८५८
रत्नागिरी- अस्मी साळुंखे
---------

अस्मी साळुंखेला
तायक्वांदोत ५ पदके

रत्नागिरी : जिल्हा क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४-२५ या स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील अस्मी साळुंखे हिने ४ सुवर्ण व १ रौप्यपदक अशी ५ पदके पटकावून घवघवीत यश मिळवून विशेष ठसा उमटवला. रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेन्टर नाचणे, ओमसाई मित्रमंडळ येथील ती खेळाडू आहे. ही स्पर्धा ५ ते ७ जुलैदरम्यान २२वी सीनिअर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर ७वी कॅडेट व पीवी मुले व मुली यांची स्पर्धा झाली. रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांचे अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन राजापूर येथे मोठ्या उत्साहात स्पर्धा पार पडली. सर्व जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी या स्पर्ध्येमध्ये सहभाग घेतला होता. अस्मीने ५ पदकांची कमाई करून ठसा उमटवला. ती पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी येथील विद्यार्थिनी आहे. ती पाचवीमध्ये शिकत आहे. तिच्या या यशामध्ये मुख्य प्रशिक्षक राम कररा, सहप्रशिक्षक तेजकुमार लोखंडे, प्रतीक पवार, अमित जाधव, महिला प्रशिक्षक शशीरेखा कररा तसेच तिची आई तन्वी साळुंखे व वडील तुषार साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले. या यशाबद्धल अस्मीचे कौतुक होत आहे.
----
आयुष चव्हाणचे
शिष्यवृत्तीत यश
साडवली ः प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती अरूंधती अरूण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. पाचवीतील विद्यार्थी आयुष चव्हाण याने संगमेश्वर तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. या परीक्षेमध्ये आयुषने ९८ टक्के गुण प्राप्त केले आहे. आठवीमधील विद्यार्थी अनुराग पंडित याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. आयुष आणि अनुराग यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेत छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, स्कूल चेअरमन राजेंद्र राजवाडे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर आणि दीक्षा खंडागळे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--------
- rat९p११.jpg -
P२४M९५८५९
चिपळूण ः शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले गद्रे स्कूलचे विद्यार्थी.

गद्रे स्कूलचे चार विद्यार्थी
गुणवत्ता यादीत

चिपळूण ः येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलमधील पाचवीतील एक व आठवीतील तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. प्राथमिक व माध्यमिक गटातील शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात झाली. त्यामध्ये चौघांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. प्राथमिक विभागात सोहम सुपनेकर ७०.७४ टक्के मिळवून तालुक्यात तिसरा आणि जिल्ह्यात ७३वा क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक विभागात सान्वी बांद्रे ७२.४८ टक्के तालुक्यात पहिली आणि जिल्ह्यात १९वी आली आहे. अर्णव चव्हाण याला ६५.७७ टक्के तालुक्यात पाचवा आणि जिल्ह्यात ४४वा क्रमांक तर जीत ओसवाल ६१ टक्के तालुक्यात १४ आणि जिल्ह्यात ८७वा क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या शहरी यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com