मर्यादित काळात अमर्यादित उद्योजकीय ज्ञान

मर्यादित काळात अमर्यादित उद्योजकीय ज्ञान

(उद्योग साकारताना ......लोगो)

- rat९p४.jpg -
P२४M९५८३५
प्रसाद जोग

उद्योजकीय ज्ञान हे एखाद्या महासागराप्रमाणे अतिविशाल असते. सुज्ञ उद्योजकाला या ज्ञानाच्या महासागरातून एका पाणबुड्याप्रमाणे समुद्राच्या तळाशी जाऊन मौल्यवान वस्तू घेऊन यायचे असते. उद्योजकीय ज्ञान हे उद्योजकांना त्यांचा उद्योग व्यवसाय फायद्यात चालविण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान असते असेही म्हणू शकतो. उद्योजकीय ज्ञान हे फक्त सिद्धांतांवर अवलंबून नसते तर ते उद्योजकीय निरिक्षणांवर व अनुभवांवरसुद्धा अवलंबून असते. हे ज्ञान अनुभवांद्वारे आणि इतर उद्योजकांच्या यशोगाथांद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. उद्योजक त्यांच्या उद्योगांमध्ये सुयोग्य व्यावसायिक धोरण अंमलात आणण्यात का अयशस्वी ठरले, याचा सखोल अभ्यास करून त्या मागची कारणमीमांसा, तत्कालीन परिस्थिती, त्या वेळी उद्योजकाने घेतलेला निर्णय या गोष्टी समजून घेऊनही मिळवता येते. उद्योजकीय ज्ञान मिळवत राहणे व त्याचा उद्योगधंद्यात प्रत्यक्ष वापर करणे, त्याचे योग्य उपयोजन करणे हे उद्योजकांकडून सातत्याने झाले पाहिजे.

- प्रसाद जोग
---------

मर्यादित काळात अमर्यादित उद्योजकीय ज्ञान

ज्ञान म्हणजे अज्ञाताकडून ज्ञाताचा प्रवास. उद्योजकीय ज्ञान हे आपल्याला काय काय माहीत नाही ते जाणून घेऊन त्यावर विचारविमर्श करायला शिकवते. उद्योजकीय ज्ञान संपादनाच्या काही पायऱ्या असतात. सातत्यपूर्ण निरीक्षण, लोकांच्या गरजा समजून घेणे, उपलब्ध संसाधनांचा खुबीने वापर करणे, उद्योग साकारताना येणाऱ्या परिस्थितीचा चिकित्सापूर्ण तौलनिक अभ्यास करणे, सातत्यपूर्ण प्रयत्न व नवनिर्माण यांचा ध्यास.
उद्योजकीय ज्ञान घेण्याची जिज्ञासाच उद्योजकीय व्यक्तिमत्वाला अधिक प्रगल्भ बनवते. उद्योजकीय ज्ञानाचे स्वरूप लक्षात आल्यास उद्योजक स्वतःहून पुढाकार घेऊन ते ज्ञान अर्जित करतो तसेच उद्योजकीय ज्ञान अर्जित करण्यासाठी संवेदना व चेतना या दोन गोष्टी महत्वाची भूमिका बजावतात. उद्योजक स्वतःचे व उद्योगाचे निश्चित प्रयोजन जाणत असेल तरच तो या अमर्यादित ज्ञानाच्या खजिन्यामधून आपल्याला व आपल्या उद्योगाला आवश्यक असणारे ज्ञान मर्यादित कालावधीमध्ये मिळवून आपल्या उद्योगात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षमता, कौशल्य विकसित करून प्रयत्नवादी होतो.
उद्योजकीय ज्ञान हे विविध शाखांचे, कलाकौशल्यांचे एकत्रित व्यावसायिक ज्ञान असल्याने त्याचे स्वरूप समजून घेणे खूप गरजेचे ठरते. उद्योजकीय ज्ञानाचे स्वरूप हे प्रवाही स्वरूपाचे व कृतीला प्राधान्य देणारे व उद्योजकाच्या कार्यक्षमतेत परिवर्तन घडवून आणणारे असू शकते. उद्योजकीय ज्ञानासंदर्भात अमर्यादित स्वरूपात गोष्टी उपलब्ध आहेत; पण उद्योजकाला मर्यादित कालावधीत उत्तम यश मिळवायचे असल्यास कोणत्या गोष्टी उद्योजकाने विशेषत्वाने लक्षात घेतल्या पाहिजेत याचा विचार करून इथे अनुक्रमे महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
तथ्य ः तथ्य आपल्याला वास्तविकता दाखवून देतात. तथ्य सांगणारे काही स्रोत संशोधनात्मक पद्धतीने उद्योजकीय ज्ञान ग्रहण करण्याची उत्सुकता असणाऱ्या उद्योजकांना शोधून काढावे लागतात.
संकल्पना ः संकल्पना या व्यक्तीसापेक्ष, कालसापेक्ष बदलू शकतात; पण संकल्पना व्यवहार्य आहेत का? अव्यवहार्य? हे तत्काळ ओळखण्याचे काम उद्योजकाला करावेच लागते. स्वकल्पना व स्वधारणा यांवरच स्वसंकल्पना मूर्त रूप घेत असतात.
पद्धत ः उद्योग उभरणीच्यावेळी कितीही ज्ञान प्राप्त असले तरी ठोकळेबद्ध पद्धतीने उद्योग उभारता येत नाहीत. प्रयत्नशील असलेले उद्योजक नेहमीच चुका व शिका या तंत्राचा अवलंब करूनच यशस्वी झालेले दिसतात. ज्ञानी उद्योजक एकच एक पद्धतीचा स्वीकार करताना दिसून येत नाहीत तर उद्योगात नफा मिळवण्यासाठी ते प्रसंगी लवचिकता दाखवून देतात.
संरचना ः उद्योजकीय गरजेप्रमाणे उद्योगाची संरचना करण्याचे स्वातंत्र्य उद्योजकाला असते. निर्णयस्वातंत्र्य योग्य पद्धतीने वापरण्यासाठी उद्योजकाला उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाने कालमर्यादेच्या कक्षेत राहून स्वतःचे असे अभिनव प्रारूप बनवायचे असते.
अभिसंरचना ः अभिसंरचना ही उद्योजकीय अभिव्यक्तीच असते. उद्योजकाने घेतलेल्या उद्योजकीय प्रशिक्षणातून उद्योजकाची अभिव्यक्त होण्याची क्षमता वाढत जाते.
कौशल्य ः कोणताही उद्योग करायचा झाल्यास विविध कौशल्य उद्योजकाला आत्मसात करावीच लागतात; पण मर्यादित कालावधीत उद्योजकाने विविध ज्ञानशाखांमधून स्वतःला लवकर जमू शकतील व उद्योजक म्हणून उद्योजकीय प्रवासात हमखास लागतील अशी तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, संवादकौशल्य, विक्रीकौशल्य शिकून घेणे गरजेचे आहे.
निवड कौशल्य ः निवड कौशल्य हे ज्ञान अर्जित केल्याने विकसित होते व उद्योगात योग्य व्यक्तींची योग्य ठिकाणी निवड करण्याची क्षमता उद्योजकाला प्राप्त होते.
विचारसंरचना ः उद्योजकाला मिळालेल्या माहितीनुसार स्वतःच्या विचारांनी आपला उद्योग चालवण्यासाठी आपल्या उद्योजकीय संघाबरोबर विचारविनिमय करून सातत्याने स्वतःचा वेगळा विचार जो ज्ञानसमृद्ध व अनुभव समृद्ध असेल, असा मांडून त्याचे प्रमाणीकरण करावे लागते.
उपयोजन ः नुसते ज्ञान असून जर त्याचे उपयोजन झाले नाही तर अर्जित केलेले अमर्यादित ज्ञान काहीही उपयोगाचे नसते म्हणून उद्योजकाला स्वतःकडे व आपल्या कर्मचाऱ्यांकडे असलेले ज्ञान हे नेहमी उपयोजित ज्ञान म्हणून कसे वापरता येईल याकडे लक्ष द्यावे लागते.
अनुभवग्रहण व विश्लेषण ः अमर्यादित ज्ञान हे आंतरजालावर विविध माहितीस्रोतांमध्ये समाविष्ट असतेच; पण उद्योजकाला आपल्या स्वतःच्या उद्योजकीय प्रवासात घेतलेल्या अनुभवांचे विश्लेषण करून पुढील आवश्यक ज्ञान ग्रहणासाठी तयार व्हावे लागते.

उद्योजकीय ज्ञान उद्योजकाला काय देते?
ग्राहकांच्या गरजांचे आकलन करण्याचे कौशल्य, स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, उद्योजकीय ज्ञान उद्योजकाला पर्यायी दृष्टी देते. एखाद्या गोष्टीला विविध पर्याय असू शकतात हे उद्योजकाला यामधून कळून येते. उद्योजकीय ज्ञान उद्योजकाला बदलासाठी तयार राहण्यास शिकवते. उद्योजकाला आपण चांगल्याप्रकारे उद्योग करू शकतो ही नवप्रेरणा मिळते. उद्योजकीय ज्ञान उद्योजकाला अनुभव समृद्ध करते

प्रश्न ः नेमके उद्योजकाने हे अमर्यादित ज्ञान हाताळायचे कसे?/ किंवा उद्योजकाने स्वतःला आवश्यक असणारे ज्ञान मिळवायचे कसे?

उद्योजकीय ज्ञान हे मर्यादित दिवसात पूर्ण करणे हे खरे पाहता आवाहनच आहे; पण उद्योजक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वतःला यशस्वी उद्योजक म्हणून घडवण्यासाठी उद्योजकीय ज्ञान प्राप्त करू शकतात. उद्योजकीय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून एकदिवशीय उद्योजकता परिचय कार्यक्रम तसेच ३,८,१५,२४,३०,६० दिवसीय मुदतीचे उद्योजकता विकास कार्यक्रम घेतले जातात यातून उद्योजकांना उद्योजकीय प्रशिक्षण मिळते. कुटुंबाचा उद्योग असल्यास कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून उद्योजकीय ज्ञान घेता येते. छोटा-मोठा उद्योग करणारे उद्योजक उद्योजकीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी एका चांगल्या उद्योजकीय प्रशिक्षकाची किंवा मार्गदर्शकाची निवड करून त्याच्याकडून व्यावहारिक उद्योजकीय ज्ञान अर्जित करू शकतात.

(लेखर उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

-----------
(२६ जून टुडे ३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com