शिक्षकांनी सांगितलेले केले तर यश निश्चित

शिक्षकांनी सांगितलेले केले तर यश निश्चित

rat९p१२.jpg -
२४M९५८६१
रत्नागिरी ः सेवानिवृत्त शिक्षिका अनुराधा तारगांवकर यांचा सत्कार करताना भाऊ शेट्ये.

शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त

प्रविंद बिरादार ः बसणीतील शेट्ये हायस्कूलचा स्थापना दिन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः शिक्षक शिकवतात ते विद्यार्थ्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. शिक्षकांनी जे सांगितले आहे ते केले तर नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले.
शहराजवळील बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलच्या ६९व्या शाळा स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अध्यक्ष अॅड. अविनाश शेट्ये, संस्थासदस्य विलास भोसले, बंधू मयेकर, संजय वारेकर, सेवानिवृत्त शिक्षिका पद्मजा बापट, अनुराधा तारगांवकर, स्नेहल पारकर, माजी विद्यार्थी, पालक, आजी विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी शाळेत फळाफुलांचे व भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी शिक्षक, क्लार्क शेटये व शिपाई भोसलेताई यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी संस्थेला ५ हजार रुपये देणगी दिली. यंदा शाळेचा निकाल १०० टक्के लागल्यामुळे प्रति विद्यार्थी पाचशे रुपयेप्रमाणे रोख बक्षिसे शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका तारगांवकर यांनी वितरित केली. संस्थेला ११ हजार रुपये देणगी दिली. मुख्याध्यापिका सुषमा शिरधनकर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन केले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी अडिचशेप्रमाणे २ हजार ७५० रुपयांची बक्षिसे दिली. बापट यांनी विद्यार्थ्यांसाठी दीड हजार रुपये देणगी दिली तसेच मुदत ठेव बक्षीस योजना रकमेत वाढ करून देणार असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थी कदम गुरूजी ५ हजार, संजीव पारकर १५ हजार, दीपक कदम ५ हजार, सुजाता मयेकर ६ हजार, विजय बसणकर ५ हजार, रामदास वायंगणकर ११ हजार यांनी आपली शाळा आपला सहभाग या संस्थेने सुरू केलेल्या अभियानासाठी देणगी दिली. शाळेचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी संजीव शंकर पारकर (काळबादेवी) यांनी ५ हजार रुपये दिले व संस्थेला १५ हजारची देणगी दिली. रोशन मयेकर यांनी शाळेला स्मार्ट टीव्ही नवनीत प्रकाशनकडून मिळवून दिला.
या वेळी अध्यक्ष भाऊ शेट्ये यांनी त्यांचे आजोबा व संस्थापक गणपतराव तथा बाबा शेट्ये यांचे कार्य, ६९ वर्षातील शाळेची वाटचाल तसेच मागील १० वर्षाचा सलग शंभर टक्के निकाल, शिक्षकांची मेहनत, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे सकारात्मक सहकार्य याबाबत कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका पंडित यांनी तर आभार नवनाथ यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com