बेरोजगारांना ग्रुपमध्ये सहभागाचे आवाहन

बेरोजगारांना ग्रुपमध्ये सहभागाचे आवाहन

Published on

बेरोजगारांना ग्रुपमध्ये
सहभागाचे आवाहन
दोडामार्गः तालुक्यातील बेरोजगारांना जोडण्यासाठी दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्थेने विशेष व्हॉट्सप ग्रुप स्थापन केला असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष तेजस देसाई यांनी केले आहे. ही स्थापन केलेली संस्था दोडामार्ग तालुक्यात पर्यटन आणि औद्योगिक क्रांती यांचा मेळ घालून उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. पहिल्या टप्प्यात तिलारी व आडाळी या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी लढा देणार आहे. या चळवळीत सहभागी व्हायचे असल्यास पूर्ण नाव, पत्ता, पाठवावा. इच्छुकांना लिंक देऊन ग्रुपमध्ये सहभागी केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
---------------
जलतरण स्पर्धांसाठी
पुण्यात निवड चाचणी
मालवणः टिळक टँक पुणे येथे ४० वी सबज्युनिअर व ५० वी ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी १९ ते २१ जुलै कालावधीत होणार आहे. या निवड चाचणीस इच्छुक जलतरणपटूंची प्रवेशिका नील लब्दे यांच्याकडे जमा कराव्यात, असे आवाहन भारतीय जलतरणचे निमंत्रक व महाराष्ट्राचे सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांनी केले आहे. राष्ट्रीय जलतरण निवड चाचणींबाबत अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
''सातोसेतील जीर्ण
वीज खांब बदला''
सावंतवाडीः सातोसे गावातील जीर्ण झालेले धोकादायक लोखंडी वीज खांब तातडीने बदलण्याची मागणी माजी सरपंच बबन सातोसकर यांनी केली आहे. विद्युत वाहिनीच्या बाजूने वाढलेल्या झाडाझुडपांची साफसफाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पावसाच्या दिवसांत गावात सातत्याने वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू आहे. सलग आठ-आठ दिवस विद्युत पुरवठा गायब असतो. सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वाहिन्यांवर वाढलेल्या झाडी, जीर्ण झालेले धोकादायक वीज खांब बदलण्याची मागणी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती; मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्याचा परिणाम गावातील वीजपुरवठ्यावर होत आहे. या समस्या महावितरणने दूर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सातोसकर यांनी दिला आहे.
-----------------
शिष्यवृत्ती परीक्षेत
आडेली शाळेचे यश
वेंगुर्लेः जिल्हा परिषद शाळा आडेली खुटवळ या प्रशालेचा पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. ओमप्रकाश काजरेकर याने ७१.१४ टक्के गुण मिळवित वेंगुर्ले तालुक्यात पाचवा व जिल्ह्यात ४५ वा क्रमांक मिळविला. या प्रशालेचे रितेश रेडकर, मानस सोन्सूरकर, लवू कुडाळकर, सोहम कासले हे विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका माधुरी पटाडे-वारंग व सुमंत पास्ते, मुख्याध्यापिका ठाकूर आदींचे मार्गदर्शन लाभले.
-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.