मायनिंगला विरोधाचे धाडस दाखवा

मायनिंगला विरोधाचे धाडस दाखवा

Published on

95887

मायनिंगला विरोधाचे धाडस दाखवा
डॉ. जयेंद्र परुळेकरः तेली, केसरकर यांना आव्हान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः आजगावसह नऊ गावांमध्ये जबरदस्तीने मायनिंग प्रकल्प लादण्याचा घाट घातला जात आहे. जनतेला हा महाकाय राक्षसी प्रकल्प नको असताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर व माजी आमदार राजन तेली यांच्याकडे या मायनिंग प्रकल्पांविरोधात ठामपणे उभे राहण्याचे धाडस आहे का? असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.
श्री. परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी मंत्री केसरकर व माजी आमदार तेली यांना लक्ष्य केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीची चाहूल लागण्याआधीच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये घमासान सुरू झाले आहे. एकमेकांच्या हकालपट्टीची भाषा करण्यात येत आहे; मात्र मंत्री केसरकर व तेली या दोघांना मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखाची कसलीच काळजी असल्याचे दिसून येत नाही. रविवारी अतिवृष्टीमुळे शेतकरी बागायतदार, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण त्याबद्दल दोघांपैकी कोणीच बोलत नाही. त्यामुळे त्यांच्या शेतकरी, बागायतदार, नागरिकांप्रती काय भावना आहेत, हे दिसून येते.
आजगाव, धाकोरे, आरवली, शिरोडासह मळेवाडपर्यंत एकूण ९ महसुली गावांमधील २१०० एकर जमिनीवर मायनिंग प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. स्थानिक जनतेला हा महाकाय राक्षसी प्रकल्प नको आहे. सर्व गावांनी तसे ग्रामसभेत ठराव करून शासनाला पाठविलेले आहेत, तरीही ड्रोनच्या सहाय्याने जबरदस्तीने सर्व्हे केले जात आहेत. महायुती सरकारचा या मायनिंग प्रकल्पाला पाठिंबा आहे; मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीची दावेदारी मांडणाऱ्या महायुतीच्याच दोन पक्षांतील या शिलेदारांकडे मायनिंग प्रकल्पाविरोधात ठामपणे उभे राहण्याचे धाडस आहे का0 हा खरा प्रश्न आज जनतेमध्ये आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.