-पुराच्या पाण्याचा अंदाज ठरला फोल

-पुराच्या पाण्याचा अंदाज ठरला फोल

Published on

-rat९p२५.jpg
२४M९५८७८
ः राजापूर ः पुरामुळे दुकाने रिकामी ठेवून व्यापाऱ्यांनी घेतलेली सावध भूमिका घेतली आहे.
--------

पुराच्या पाण्याचा अंदाज ठरला फोल

राजापूरचे व्यापारी चिंतेत ; गाळ उपशानंतरही दुकानांमध्ये पाणी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः दरवर्षीच्या पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा गेले दोन वर्ष उपसा करण्यात आला आहे. गतवर्षी शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती; मात्र पुराची तीव्रता कमी होती. हीच स्थिती यावर्षी राहण्याचा अंदाज साऱ्‍यांनी बांधला होता; मात्र तो फोल ठरला. काही तासातच पुराचे पाणी दुकानामध्ये घुसल्याने व्यापाऱ्‍यांची तारांबळ उडाली.
पूरस्थितीच्या या अनुभवाने व्यापारी अलर्ट झाला आहे. दुकानांमध्ये जादा माल ठेवलेल्या मालाचे पुराच्या पाण्यामध्ये नुकसान होण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी माल हलविण्याला व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये मालाने भरलेली दुकाने रिकामी दिसत आहेत. गतवर्षी अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा झाला होता. त्याच्या जोडीने जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीतून गतवर्षी अन् यावर्षीही नदीपात्रातील गाळाचा उपसा झाला आहे. या उपशानंतर गतवर्षी पूर आला असला तरी दरवर्षीच्या तुलनेमध्ये पुराची तीव्रता कमी झाली होती. त्यामुळे दरवर्षी नुकसानीच्या खाईत लोटणाऱ्‍या व्यापाऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला होता. त्यामुळे पूर आला तरी गतवर्षीप्रमाणे पुराची तीव्रता कमी राहील, असा अंदाज होता; मात्र तो तो फोल ठरला. वेगाने वाढलेल्या पुराच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पुढे धडक मारली. त्यामुळे व्यापारी चिंतेत पडले आहेत.
--------------
कोट
दिवसभर पावसाचा जोर असला तरी नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तरी पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज नव्हता. अनेक वर्षाच्या पुराच्या पूर्वानुभवामुळे आम्ही सतर्क होतो; परंतु पुराच्या पाणी अनपेक्षितपणे काही मिनिटांमध्ये दुकानामध्ये घुसू लागले. पुराच्या पाण्याचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने मालाची सुरक्षित ठिकाणी हलवाहलव करताना तारांबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच्या पुराचा अनुभव पाहता दुकानामध्ये जादा माल ठेवण्याऐवजी अन्यत्र सुरक्षित ठिकाणी ठेवण्यावर भर दिला आहे.

--ओमकार, व्यापारी, राजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.