चाफेली-काजरगोठणवाडीतील कॉजवे वाहून गेल्याने गैरसोय

चाफेली-काजरगोठणवाडीतील कॉजवे वाहून गेल्याने गैरसोय

Published on

95890

चाफेली-काजरगोठणवाडीतील
कॉजवे वाहून गेल्याने गैरसोय
निकृष्ट कामः अधिकाऱ्यांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः माणगाव खोऱ्यातील चाफेली-काजरगोठणवाडी मुख्य रस्त्यावरील कॉजवेचा एक भाग निकृष्ट कामामुळे रविवारी (ता. ७) आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेला. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. ऐन पावसाळ्यात कॉजवे वाहून गेल्याने करायचे काय, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
गेले दोन दिवस माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यदृष्टी झाली. त्यामुळे कर्ली नदीसह नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले. या पाण्याच्या प्रवाहात चाफेली-काजरगोठणवाडी रस्त्यावरील कॉजवेचे स्लॅप वाहून गेले. जिल्हा वार्षिक योजनेतून या कॉजवेचे काम सोमवारी (ता. ८) भैरव मजूर सहकारी संस्था, कसालच्या माध्यमातून सुरू होते.
जवळपास ९ लाख ४३ हजार ६२ रुपयांचे हे काम आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चाफेली येथील कॉजवे वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळचे उपअभियंता श्री. पिसाळ व शाखा अभियंता श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या कामाची मुदत अद्यापही बाकी असून मुदतीत काम न झाल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्यस्थितीत ग्रामस्थांच्या सुविधेबाबत तुम्ही काय करणार? असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर बांधकामच्या या दोन्ही अधिकार्‍यांनी बोलण्याचे टाळले असल्याचे ग्रामस्थ अजय सावंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.