देवळेघाट वाहतुकीस धोकादायक

देवळेघाट वाहतुकीस धोकादायक

-rat९p५.jpg
P२४M९५८३६
ः साखरपा ः मोरीच्या बांधकामामुळे रस्त्यावर सोडण्यात आलेले पाणी.
-rat९p६.jpg
२४M९५८३७
ः दाभोळे गावानजीक सुरू झालेल्या पुलाचे सुरू असलेले काम.
-rat९p७.jpg ः
२४M९५८३८
रस्त्याकडेला आलेली दरड.
-rat९p८.jpg
P२४M९५८३९
ः टाक्याचा माळ येथे रस्त्याची झालेली दुरवस्था.
---------------

देवळे घाट वाहतुकीस धोकादायक

जागोजागी चिखल; दरड कोसळण्याची भीती, ठिकठिकाणी काम अर्धवट

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ९ : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे आंबाघाटाप्रमाणेच देवळेघाटही वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेली कामे, रस्त्यासाठीचे खोदकाम, ढासळलेली माती यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. घाट परिसर असल्यामुळे वाहनचालकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे देवळेफाट्यापासून दाभोळे गावापर्यंत असलेला घाट हा देवळेघाट म्हणून ओळखला जातो. साडेतीन किमीचा हा घाट आहे; पण आता महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हा घाट धोकादायक झाला आहे. ठिकठिकाणी घाटात काम सुरू असल्यामुळे वाहने चालवायची कशी, हा प्रश्न चालकांना पडत आहे. देवळेफाटाजवळ जुन्या रस्त्याच्या कडेला डोंगरात जेसीबीने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातील माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल झाला आहे. त्यावरून दुचाकी घसरून चालक जखमी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. घाटातील अवघ्या अर्धा किमीच्या एकाच पॅचचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दाभोळे गावाच्या बाहेरून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी काजळी नदीवर लांजा रस्त्यावरून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. घाटात टाक्याचा माळ ते यु आकारातील वळण या भागातील रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. एका बाजूला डोंगर असल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी या भागात साचते. याच ठिकाणी सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामामुळे डोंगरातून आलेले पाणी थेट रस्त्यावरच सोडण्यात आले आहे. त्यामुळे खालील रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वाहने चालवणे हे दिव्य ठरत आहे.
----
दृष्टिक्षेपात
* साडेतीन किमीच्या भागाचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट
* ठिकठिकाणी डोंगराचे खोदकाम सुरू
* मातीच्या ढिगाऱ्‍यांमुळे चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य
* टाक्याचा माळ येथे रास्ता अत्यंत धोकादायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com