लांजातील गुणवंत १५० विद्यार्थ्यांचा गौरव

लांजातील गुणवंत १५० विद्यार्थ्यांचा गौरव

-rat९p२२.jpg -
P२४M९५८७२
लांजा ः विद्यार्थ्यांना गौरविताना दत्ता कदम.
---------

लांजातील १५० विद्यार्थ्यांचा गौरव

लांजा, ता. ९ ः लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, लांजा तालुका गणित अध्यापक मंडळ, विज्ञान अध्यापक मंडळ आणि राजापूर-लांजा नागरिक संघातर्फे न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी शिक्षणप्रेमी दत्ता कदम, राष्ट्रवादी काँग्रसचे तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, राजापूर-लांजा नागरिक संघाचे सल्लागार गणपत शिर्के, लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या आठवले, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र साळवी आदी उपस्थित होते. दहावी, बारावीतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी तसेच एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. सेवानिवृत्त झालेले हर्चे हायस्कूलचे मुख्याध्यापक जयसिंग पाटील, वेरवली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गांगण, तळवडे हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक प्रभाकर सनगरे, आसगे हायस्कूलचे शिक्षक दळवी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तालुक्यातील सुमारे १५०हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com