पीक विमा घ्या, शेतीचे नुकसान टाळा

पीक विमा घ्या, शेतीचे नुकसान टाळा

पिकविमा घ्या, शेतीचे नुकसान टाळा

कृषी विभागाचे आवाहन ; १५ जुलै अंतिम तारीख

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीला संरक्षण मिळावे, शेतकऱ्‍याचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने प्रधानमंत्री पिकविमा योजना सुरू केली आहे. गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पाऊस, विविध वादळं आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्‍यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतीतील संभाव्य धोका ओळखून या योजनेंतर्गंत जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांनी पिकविमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अनिल गावीत यांनी केले आहे.
या योजनेमध्ये काही ठराविक रक्कम भरून भातासह नागली पिकांचे विमा उतरविले जातात. या योजनेमध्ये जोखीमस्तर सर्व पिकांसाठी सत्तर टक्के ठेवण्यात आला आहे. प्रतिकूल हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीकपेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, कीड व रोग आदींमुळे उत्पादनात होणारी घट, काढणीपश्‍चात नुकसान आदी निकषान्वये नुकसानीची छाननी करून विमा उतरविलेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जाते. सर्व शेतकऱ्‍यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. पिकविमा योजनेमध्ये नाचणी आणि भातपिकांचा समावेश आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गावित यांनी केले आहे.
--------
पिकविमा हप्ता दर, संरक्षित रक्कम
प्रधानमंत्री पिकविमा योजनेमध्ये एक रुपयामध्ये पिकविमा उतरविता येत असून प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास भाताला प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये तर नाचणीसाठी २० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठेवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com