भात लावणीत यंत्रांचा बोलबाला

भात लावणीत यंत्रांचा बोलबाला

Published on

96123
95938


भात लावणीत यंत्रांचा बोलबाला
बियाणेही संकरितः नांगरणीसाठी सऱ्हास टिलरचा वापर
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १०ः परिसरात भात लावणीच्या कामाला वेग आला असून सध्या पारंपरिक पध्दतीला आधुनिकतेची जोड देऊन शेती करताना ९० टक्के संकरित बियाणे वापरण्यात येत आहेत. नांगरणीसाठी पॉवर टिलरच शेतीत दिसून येत आहे.
पावसाने यावर्षी वेळेत हजेरी लावल्याने पेरणीही वेळेत झाली. आतापर्यंत पावसाची कामगिरी समाधानकारक आहे. मात्र, आता लावणीला जोरदार सुरवात झाल्याने पावसात सातत्य गरजेचे आहे. शनिवार, रविवारी झालेल्या पावसाने शेतजमिनीत उमाळे फुटल्याने शेतकरी समाधानी आहे. यावर्षी पावसाने बरोबर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर एन्ट्री घेतली. त्यामुळे पाऊस चांगला होईल, असे मत पारंपरिक शेतकरी व्यक्त करत आहेत. यंदा एकमिरगी सुरवात झाली आहे, असे स्थानिकांच्या भाषेत बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांत रोपं लावणीच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार पावसाची गरज होती. त्याप्रमाणे गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे नदी, ओहोळ तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस होऊन पीक चांगले येईल, अशी आशा आहे. पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी अद्याप वातावरणात थंडावा आलेला नाही. सध्या पडत असलेला पाऊस शेतीसाठी पुरक असला तरी येत्या काही दिवसांत रोपं लावणीच्या कामाला सुरुवात झाल्याने यावेळी मुबलक पावसाची गरज आहे.

चौकच
मासळी बाजार थंडावले
खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने सध्या खवय्यांची पंचायत होत असून पर्यायी सुकी मासळी किंवा नदीतील मासे भाव वाढला आहे. परिणामी मासळी बाजार थंडावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.