''नाथ पै सेंट्रल''च्या मुलांची आज विधानभवनाला भेट

''नाथ पै सेंट्रल''च्या मुलांची आज विधानभवनाला भेट

''नाथ पै''च्या मुलांची
विधानभवनाला भेट
कुडाळः येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची आठवी, नववी, अकरावी व बारावीचे विद्यार्थी मुंबई येथील विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव घेण्यासाठी उद्या (ता. १०) मुंबई येथे रवाना होणार आहेत. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने प्रा. चैताली बांदेकर, शिक्षिका सायलीन वारंग, प्रिया केटगाळे, मिशेल फर्नांडिस, निकिता गावडे व अश्विनी परब यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या विधानभवन शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गामध्ये यापूर्वी याच संस्थेच्या बॅ. नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विधानसभेचे कामकाज तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहिले होते. त्यानंतर प्रथमच अशा प्रकारे बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल (सीबीएसई बोर्ड स्कूल) शाळेतर्फे पुढाकार घेऊन शालेय मुलांना विधानसभेचे कामकाज कसे चालते, हे पाहण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याबद्दल पालकांतर्फे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com