चिरे वाहतूक करणारे ट्रक ग्रामस्थांनी अडवले

चिरे वाहतूक करणारे ट्रक ग्रामस्थांनी अडवले

चिरे वाहतूक करणारे
ट्रक ग्रामस्थांनी अडवले
लांजा, ता. ९ ः लांजा-आसगे-तळवडे-दाभोळे या रस्त्यावरील चिरे वाहतूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या घेतलेल्या भूमिकेनंतरही या मार्गावर सुरू असल्याने काही ग्रामस्थांनी कुरचुंब येथे चिरे वाहतूक करणारे ट्रक अडवले.
लांजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर प्रशासनाने चिरे वाहतूक बंद करण्याच्या सूचना खाणमालक यांना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी दाजी गडहिरे यांच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले होते; मात्र आज सकाळपासून चिरे वाहतूक सुरू असल्याचे समजल्यावर काही ग्रामस्थांनी वाहतूक करणाऱ्या चिऱ्याच्या ट्रकचा पाठलाग केला. या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यावरून वाहनधारकांना गाडी चालवणे कठीण बनले आहे. मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहतुकीची वाहने चालविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागते. तहसीलदारांचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते. तळवडे, कुरचुंब, आसगे, आडवली आदी गावातील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या परिस्थितीकडे तालुका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com