भूलथापांना जनता बळी पडणार नाही

भूलथापांना जनता बळी पडणार नाही

Published on

95990

भूलथापांना जनता बळी पडणार नाही
बाळा गावडेः मंत्री केसरकर यांच्यावर टिका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा निधी, जर्मनीत तरुणांना रोजगार, पर्यटन प्रकल्प यावर बोलत आहेत. मात्र, सुज्ञ जनता त्यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. येत्या निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी व्यक्त केला.
श्री. गावडे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘गेली १५ वर्षात चष्माचे कारखाने, सेटअप बॉक्स, महिला बचत गटांसाठी काथ्या व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय अशा अनेक व्यवसायांवर बोलून यापैकी कोणताही व्यवसाय या मतदारसंघात राबवला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सावंतवाडी तालुक्यात मंजूर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल केसरकरांच्या हेकेकोरपणामुळे गेली सात वर्ष झाले नाही. त्यामुळे सामान्य जनतेला आरोग्याच्या प्रश्नासाठी अजूनही गोवा बांबोळी येथे जावे लागते. सिंधुदुर्ग हा शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रगत जिल्हा आहे. आणि अशा जिल्ह्यातील शिक्षणाचे आणि तरुणांचे प्रश्न यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत सुटले नसून वाढत चालले आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना यांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत न्याय मिळाला नाही. कोरोना काळात केसरकर या मतदारसंघाचे आमदार असताना मुंबईत बसलेले. जनतेच्या मदतीसाठी त्यांनी कुठेही सहकार्य केलेले नाही. ते फक्त मायनिंग लॉबीचे एजंट आहेत. आणि जर ते एजंट नसतील तर त्यांनी आजगाव धाकोऱ्याची मायनिंग रद्द करून दाखवावी.
श्री. ठाकरे यांनी केसरकर यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाठी राजकीय पुनर्वसन करून मंत्रिपद दिले. परंतु, त्यांच्यासोबत सुद्धा यांनी गद्दारी केली. त्यामुळे त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अद्दल घडवून घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही गावडे यांनी म्हटले आहे.

कोट
भाजपचे राजन तेली यांनी केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत विकासाच्या दृष्टीने मागे गेला, अशी वक्तव्य केलीत. तेली सुद्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा केविलवाणी धडपड करत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता तेली हे दोनदा पराभूत झालेले आहेत. भविष्यात या मतदारसंघात बाहेरून आलेले उमेदवार जनता स्वीकारणार नाही. त्यामुळे तेली यांना पराभवाची हॅट्रिक करायचे असेल तर त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत रिंगणात उतरावे.
- चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.