नाल्यातलं पाणी थेट अपार्टमेंटच्या तळमजल्यात

नाल्यातलं पाणी थेट अपार्टमेंटच्या तळमजल्यात

Published on

-ratchl९६.jpg-
२४M९५९९३
चिपळूण ः अपार्टमेंट रॉयलनगर येथे नाला फुटल्याने आलेले पावसाचे पाणी.
------------------

नाल्यातलं पाणी थेट अपार्टमेंटमध्ये

चिपळूण पालिकेचे दुर्लक्ष ; रॉयलनगर येथील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः शहरातील रॉयलनगर येथील अपार्टमेंट परिसरातील नाला फुटल्याने पावसाचे पाणी थेट तळमजल्यात शिरल्याचा प्रकार रविवारी झालेल्या पावसात घडला. मुसळधार पावसात हा प्रकार घडत असल्याने नागरिकांना बाहेर पडणे अवघड बनले आहे.
या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सदनिकाधारकांचे वीजमिटर आहेत. चुकून विद्युतवाहिनीला पाणी लागले तर विजेचा धक्का बसण्याची शक्यताही नाकारता येत आहे. काही वर्षांपर्वी काही ठराविक लोकांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे अर्जही दिला होता; परंतु त्यानंतर पाठपुरावा झाला नाही. रॉयलनगर येथील नाला खूप जुना आहे. नाला फुटल्याने अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये ढोपराभर पाणी येत आहे तसेच पाणी निघून गेल्यावर चिखल होत आहे. त्या चिखलावरून कोणी पडले तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. या परिसरात पाणी साचून राहत असल्याने डासांचा त्रासही वाढला आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी रॉयलनगरमधील महिलांनी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनही दिले आहे; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.