कणकवली : दुचाकी चोरी

कणकवली : दुचाकी चोरी

Published on

दुचाकी चोरी प्रकरणी
कासार्डेत एक ताब्‍यात
कणकवली, ता.९ : तालुक्‍यातील कासार्डे तिठा येथील दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उमेश परशुराम राणे ( वय ४५,रा.कासार्डे, दक्षिण गावठण) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक चौकशीसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फिर्यादी निलेश लक्ष्मण शिंदे (रा. कासार्डे तिठा, मूळ जांभवडे, कुडाळ) यांच्या दुचाकीची चोरी केली होती. त्याबाबत कणकवली पोलिसात शिंदे यांनी तक्रार दिली होती. ही घटना शनिवारी ६ जुलै रोजी रात्री ९.३० ते १२.१५ वाजण्याच्या मुदतीत घडली होती. चोरीस गेलेली दुचाकी आज कासार्डे, दक्षिण गावठण येथील जंगलमय भागात बेवारस स्थितीत कणकवली पोलिसांना आढळून आली. दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार एका संशयित चोरट्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली असता संशयित आरोपी उमेश परशूराम राणे याने त्या दुचाकी चोरीची कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.