हत्ती

हत्ती

Published on

९६०६३
मोर्लेत हत्तीची घुसखोरी; फणसावर ताव
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ९ : खाद्याच्या शोधात असलेल्या हत्तींनी आज दिवसाढवळ्या थेट वस्तीत येऊन फणसांवर ताव मारला. दोन्ही पाय फणसाच्या झाडाला लावून सोंडेने फणस काढतानाची हत्तीची छायाचित्रे मोर्ले ग्रामस्थांनी कॅमेऱ्यात कैद केली आहेत. हत्तींच्या नजाकतींची छायाचित्रे काढण्यास ग्रामस्थांना मजा वाटत असली, तरी त्यापेक्षा ते अधिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
हत्तींचा वावर लोकवस्तीकडे वाढत चालला आहे. जंगलात असलेले अपुरे खाद्य यामुळे हत्ती खाद्याच्या शोधात लोकवस्तीत घुसखोरी करू लागले आहेत. दोडामार्ग तालुक्यात हत्तीबाधित गावात फणसाची झाडे पुष्कळ आहेत. त्या झाडांवर अद्यापही फळे आहेत. त्यामुळे खाद्याच्या शोधात असलेले हत्ती वस्तीत फिरकत असताना त्यांच्या नजरेस फणसाची झाडे पडतात. त्यांनी एकदा फणस खाल्ले की ते पुन्हा त्या ठिकाणी हजेरी लावतात. तसाच प्रकार आता मोर्ले गावात घडत आहे. मोर्ले गावात ठाण मांडून बसलेले हत्ती आता फणसाच्या शोधात वस्तीत घुसू लागले आहेत. आज चक्क दुपारी हत्ती फणसाच्या झाडाला पाय लावून सोंडेने फणस काढतानाचे दृश्य ग्रामस्थांनी पाहिले. त्याची छायाचित्रे काही ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.