हरकुळ बुद्रुक येथे रस्ता खचला

हरकुळ बुद्रुक येथे रस्ता खचला

Published on

96081
हरकुळ बुद्रुक येथे रस्ता खचला
कणकवली, ता. १० : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे जगमेश्वर देवस्थान ते सोहनीवाडी येथे जाणारा रस्ता आणि त्यावरील मोरीचे बांधकाम खचले आहे. मोरी कोसळल्यामुळे नागरिकांना जाणे-येणे बंद झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ३ लाख ९६ हजार २९५ रुपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम केले होते. कामाचा अध्यादेश ३० जूनच्या अखेरीस काढला होता. त्यानंतर ठेकेदारांनी काम पूर्ण केले. ऐन पावसाळ्यामध्ये काम पूर्ण केल्यानंतर मुसळधार पावसात रस्ता खचला असून मोरीही वाहून गेली आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सोहनीवाडीतील नागरिकांना ये जा करण्यासाठी हा रस्ता होता. ग्रामपंचायीच्या वतीने रस्त्याचे काम जि. पं. बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने रस्ता वाहून गेला आहे. तसेच नव्याने बांधलेली सिंमेटची मोरी कोसळली आहे. परिणामी रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.