श्रद्धांजलीतून डॉ. माधवी साठेंच्या कार्याल ‌‘सलाम‌’

श्रद्धांजलीतून डॉ. माधवी साठेंच्या कार्याल ‌‘सलाम‌’

Published on

- rat१०p२.jpg-
२४M९६०८६
चिपळूण ः (कै.) डॉ. माधवी साठे यांच्या स्मृतींना उजाळा देताना दिलीप आंब्रे.

डॉ. माधवी साठेंच्या कार्याला ‌‘सलाम‌’

स्मृतींना उजाळा ; आम्ही मिळूनी सारे ग्रुपचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः येथील ‌‘आम्ही मिळूनी सारे‌’ या ग्रुपने आयोजित केलेल्या (कै.) माधवीताई साठे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमावेळी उपस्थित चिपळूणवासीय अतिशय भावनिक झाले होते. ज्येष्ठ नागरिक संघ, वैद्य मंडळ, निमा मंडळ, दुर्गाशक्ती संस्था, नाट्य परिषद व नातेवाईक, मित्रमंडळींनी डॉ. साठे यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजलीतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला ‌‘सलाम‌’ केला.
शहरातील लोकमान्य टिळक वाचनमंदिराच्या सभागृहात नुकताच डॉ. साठे यांचा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला आमदार शेखर निकम यांच्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले. चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी, डॉ. रत्नाकर थत्ते, दिलीप आंब्रे, माधवी भागवत, प्रज्ञा मोने (मानस कन्या) यांच्या भावनिक आठवणीने उपस्थितांची मने हेलावली. त्यांची कन्या जयश्री यांना तर आईच्या आठवणीने शब्दचं फुटले नाहीत. संपूर्ण सभागृह निःशब्द झाला. आम्ही मिळूनी सारे, या ग्रुपने साठे यांच्या प्रति असलेला जिव्हाळा आणि प्रेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केला. प्रत्येकाला मरण अटळ आहे; पण गेल्यानंतरही प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवणे आवश्यक आहे. हे स्थान आपल्या वागणुकीने, कर्तृत्वाने माधवीताईंनी मिळवल्याचे बांगी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लीना जावकर यांनी केले.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.