८० वर्षे पूर्ण करणाऱ्यांचे सामुहिक सहस्रचंद्रदर्शन

८० वर्षे पूर्ण करणाऱ्यांचे सामुहिक सहस्रचंद्रदर्शन

- rat१०p८.jpg-
२४M९६०९८
चिपळूण ः ब्राह्मण सहाय्यक संघात झालेला सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम.

वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्यांचे सामूहिक सहस्रचंद्रदर्शन

चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघाचा उपक्रम ; उत्सवमूर्ती भारावले

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १०ः चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण समाजातील वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना संघाच्या कार्यालयात एकत्र आणून त्यांचा सामूहिक सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमामुळे उत्सवमूर्ती भारावले.
चिपळूणचा ब्राह्मण सहाय्यक संघ १९ ऑगस्ट १९७४ ला स्थापन झाला. १९ ऑगस्ट २०२३ ते १८ ऑगस्ट २०२४ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्ताने नेहमीच्या वार्षिक कार्यक्रमाबरोबर काही लोकाभिमुख उपक्रम साजरे करावेत, असे संघ संचालकांनी ठरवले आहे. त्यामधून चिपळूणमधील ज्या ब्राह्मण स्त्री-पुरुषांचे वय ८० वर्षे झाले आहे त्या लोकांना एकत्रित आणून सामूहिक सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रविवारी (ता. ७) सकाळी धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरवात झाली. रमेश आगवेकर, सुशीला आगवेकर यांनी गणेशपूजन करून पुण्याहवाचन केले. पौरोहित्याची जबाबदारी संजय जोशी, मंदार दीक्षित, सागर जोशी, प्रसाद जोशी यांनी सांभाळली. पिठाचे ८१ दिवे एका मोठ्या परातीत घेऊन सर्व उत्सवमूर्तींना ओवाळण्यात आले. एका ताम्हणात पातळ केलेले तूप घेऊन प्रत्येकासमोर नेण्यात आले. त्यात त्याने स्वतःचे प्रतिबिंब पहिले. या कार्यक्रमाने आनंदी होऊन काही उत्सवमूर्तींनी आपल्या भावना उपस्थितांपुढे मांडल्या. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मणसंघाच्या सर्व संचालकांनी आणि संघाच्या महिला मंडळाने विशेष योगदान दिले. सचिन चितळे, संजय नाचणकर आणि करंजकर यांचे सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com