जलजीवन''च्या कामांमध्ये भ्रष्टाचार

जलजीवन''च्या कामांमध्ये भ्रष्टाचार

Published on

96129

‘जलजीवन’च्या कामांमध्ये
भ्रष्टाचारः वैभव नाईक
पाणीपुरवठा मंत्र्यांकडे कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः जिल्ह्यातील जलजीवन मिशन कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार वैभव नाईक यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले. दोषी आधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बहुतेक गावांना पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करण्याकरिता अनेक कामे हाती घेण्यात आली होती. परंतु, जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी ८० टक्के कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांची यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत मोठी गैरसोय निर्माण होत आहे. जलजीवन मिशनच्या सर्व कामांमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार झाल्यामुळे हे कामे अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाईक यांनी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांची सभागृहामध्ये भेट घेतली. पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी व जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे मार्गी लागण्याकरिता लवकरात लवकर या कामांची आढावा बैठक घेण्यात यावी, या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांना या सर्व कामाच्या सद्यस्थितीबाबत इत्यंभूत माहिती घेऊन उपस्थित राहण्याबाबतचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार नाईक यांनी पत्राद्वारे मंत्री पाटील यांच्याकडे मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.