एसटी बसेस आरवली उड्डाणपुलावरून सुसाट

एसटी बसेस आरवली उड्डाणपुलावरून सुसाट

Published on

-rat१०p१८.jpg-
२४M९६१५०
संगमेश्वर ः आरवली येथील या सर्व्हिस रोडवरून एसटी गाड्या थांब्यावर येणे अपेक्षित आहे.
--------------
एसटी बस आरवली उड्डाणपुलावरून सुसाट

परवड प्रवाशांची; थांबा शोभेचाच, चालक-वाहकांचे एकमेकांकडे बोट
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बेदरकारपणे उड्डाणपुलावरून जात असल्याने प्रवाशांची परवड होत आहे.
एसटी बसना मुंबई-गोवा महामार्गावर आरवली येथे अधिकृत थांबा आहे. अपवादात्मक चिपळूण-रत्नागिरी एक थांब्यासारखी गाडी वगळता प्रत्येक गाडी आरवली येथे थांबणे अनिवार्य आहे. मुंबई-पुणे व अन्य लांब पल्ल्याहून येणाऱ्या बसेसना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आरक्षणदेखील दिले जाते. ही वस्तुस्थिती असताना वाहक, चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासीवर्गाला शारीरिक व मानसिक त्रासाला समोरे जावे लागत आहे. आरवली या थांब्यावर २५ गावातून प्रवासी येत असतात. मोठ्या आशेने एसटी बसेसची ऊन-पावसात आरवली थांब्यावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना जेव्हा अनधिकृतपणे उड्डाणपुलावरून एसटी बस समोरून जाताना दिसते त्या वेळी प्रवाशांची कुचंबणा झालेली पाहायला मिळत आहे. प्रवाशांचा वेळही वाया जात आहे. यामध्ये नोकरदार व विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या वेळेला मुकावे लागत आहे शिवाय आरवली थांब्यावर बसण्याची सोय नसल्यामुळे गरोदर महिला, वृद्ध प्रवासी, शाळकरी मुले, आजारी व्यक्ती यांसह साऱ्यांनाच ऊन- पावसात ताटकळत उभे रहावे लागत आहे.
दुसरीकडे एसटी बसमधून प्रवास करून आरवली थांब्यावर उतरण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रवाशांना चक्क गाडी उड्डाणपुलावरून जाईल, असे सांगितले जाते आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना आरवलीत केदारनाथ मंदिराजवळ उतरवले जात आहे. संगमेश्वरकडून चिपळूणकडे जाताना स्टेटबँकेच्या इथे उतरवले जात आहे. यामध्ये मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. असे असताना अर्ध्यावर उतरवणे हे माणुसकीला धरून आहे का? असा सवाल संतप्त प्रवासी करत आहेत. एवढ्या लांबून आपले सामान घेऊन चालत येणे वृद्धांना जिकिरीचे होत आहे.
चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना प्रवाशांनी वाहकाला बस पुलाखालून जाईल ना, अशी विचारणा केल्यावर वाहकाकडून उद्धटपणे उत्तरे दिली जात आहेत. वाहक-चालक संगनमताने एकमेकांकडे सोयीस्कररित्या बोट दाखवून प्रवाशांचे हाल करत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. राज्य शासन स्वतःच्या तिजोरीवर भार घेऊन ७५ वर्षावरील प्रवाशांना फुकट, महिलांना ५० टक्के सवलत, मुलींना मोफत पास असे अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहे. दुसरीकडे रिकाम्या बस फिरवण्यात धन्यता मानणारे वाहक-चालक, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणारे मंडळाचे कर्मचारी, प्रवाशांना खासगी सेवेचा आधार घ्यायला पर्यायाने प्रवृत्त करत आहेत.
---------------
चौकट
...तर आंदोलनाचा पवित्रा!
''प्रवाशांच्या सेवेसाठी'' अशी बिरूदावली मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडूनच पायमल्ली केली जात असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलावरून रिकामी जाणारी बस जेव्हा आरवलीत प्रवाशांना दिसते त्या वेळी महामंडळाला प्रवाशांची व उत्पन्नाची गरज नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. या गोष्टीकडे चिपळूण, रत्नागिरी, देवरूख आगारांनी लक्ष न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.